शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:21 IST

गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देमागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार३ आॅक्टोबरपासून महसूल कर्मचाऱ्यांचे कामकाज बंद आंदोलन जिल्ह्यातील ४५० कर्मचारी सहभागी

रत्नागिरी,१० : गेल्या तीन वर्षापासून महसूल कर्मचाºयांच्या मागण्यांची पुर्तता शासनाकडून झाली नसल्याने अखेर पुरवठा विभागाबरोबरच या कर्मचाºयांनी आता महसूल विभागाचे कामही आजपासून बंद केले आहे. जोपर्यंत या मागण्यांची पुर्तता होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार संघटनेने केला आहे.

२०१२ पासून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. दरवर्षी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. मात्र, शासनाने याकडे पुर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. त्यातच पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

या निर्णयामुळे महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रत्यार्पित होऊन पदावनत व अतिरिक्त ठरतील. परिणामी बेकारीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, या भीतीने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

याबाबत महसूलमंत्री यांच्याशी राज्य संघटनेने चर्चा करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. महसूल विभागातील या निर्णयांना स्थगिती मिळावी, या मागणीसाठी गेल्या ३ आॅक्टोबरपासून महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यभरच पुरवठा विभागाचे कामकाज बंद केले आहे.

या संपात जिल्ह्यात चतुर्थ श्रेणी ते पदोन्नत नायब तहसीलदार मिळून जिल्ह्यातील ४५० कर्मचारी सहभागी झाली आहेत. आज सकाळी येथील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या महापुरूष मंदिरात रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघांची बैठक झाली.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जोपर्यंत शासन दखल घेणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला