रत्नागिरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०१४ चा आॅनलाईन निकाल आज जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींची टक्केवारी यंदाही मुलांच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल मात्र अतिशय कमी म्हणजे ३३.६६ टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात एकूण २०३७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९२०३ विद्यार्थी (९४.२४ टक्के) उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३५ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४१ आहे. या परीक्षेसाठी १०,८७३ विद्यार्थी बसले. त्यापैकी १०.०४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९५०३ मुलींपैकी ९१६२ (९६.४१ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.१३ टक्के लागला असून ७३१ पैकी ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ‘वाणिज्य’चा निकाल ९६.६५ टक्के लागला असून ७६३९ विद्यार्थ्यांपैकी ७३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ९३.१६ लागला असून ५१५७ विद्यार्थ्यांपैकी ४८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर कला शाखेचा निकाल ९२.०७ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ६८१९ विद्यार्थ्यांपैकी ६२७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमानुसार, जिल्ह्यात एकूण ९२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. त्यापैकी ३१० विद्यार्थी (३३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. एकूण ६५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९८ (३०.३२ टक्के) उत्तीर्ण झाले, तर एकूण २६८ विद्यार्थिनींपैकी ११२ मुली (४१.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ६२.५० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या ८ पैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ३५.३८ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या १९५ विद्यार्थ्यांपैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘कला’चा निकाल ३६.६४ टक्के लागला असून, ३६३ विद्यार्थ्यांपैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल २९.०१ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ३५५ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमासाठी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणार्या निकालपत्राचे वाटप दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
रत्नागिरीचा निकाल ९४ टक्के
By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST