शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीचा संदेश देत चिमुकल्याची दिवाळी,  माहेर संस्थेत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:54 IST

अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत.

ठळक मुद्देप्रदूषणमुक्तीचा संदेश देत चिमुकल्याची दिवाळी,  माहेर संस्थेत उपक्रमभेटकार्डच्या माध्यमातून  पर्यावरणपूरक शुभेच्छा, निराधारांची भाऊबीज उत्साहात

रत्नागिरी : अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत.भेड कार्डवर दिवाली का जश्न मनाएं पर्यावरण सुरक्षित बनाए हवा और ध्वनी प्रदूषण को काम करने के लिए सुरक्षित दिवाली मनाए यांसारखे सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश लिहून संस्थेत दिवाळीसाठी येणाऱ्या हितचिंतकांचे प्रवेशितांनी बनविलेले ग्रिटिंग कार्ड व कागदी फुले देऊन शुभेच्छापर प्रबोधन करण्यात आले आहे.

माहेर संस्थेत ३५ अनाथ निराधार मुले-मुली तसेच ६० निराधार महिला व पुरूष राहात आहेत. या सर्व उपेक्षितांना जगण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने संस्थेत विविध कार्यक्रम, सण, उत्सव साजरे केले जातात. संस्थेच्या बालकांनी येथील अधीक्षक सुनील कांबळे यांच्याच मार्गदर्शनाखाली दिवाळीची तयारी केली.ग्रिटिंग, कागदी फुले, रांगोळी, सजावटही संस्थेतील प्रवेशितांनी केली आहे. समाजातील हितचिंतक संस्थेला फराळ, नवे कपडे, साबण, तेल, उटणे इत्यादी देत असतात. दरवर्षीप्रमाणे जॉय आॅफ गिव्हिंग ग्रुप, रत्नागिरी यांनी सर्व प्रवेशितांना भेट वस्तू दिल्या.

संस्थेतील सर्व प्रवेशितांनी दिवाळी फराळ व मिठाई यावर यथेच्छ ताव मारला. निराधार महिलांनी निराधार पुरुषांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. माहेर संस्थेत सहभागी झालेल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कायम राहण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून त्यांना मनमोकळेपणाने जगता येणे शक्यही होत आहे. त्यामुळे हे उपक्रम उपयुक्त ठरत आहेत.या उत्सवाच्या तयारीत संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे, मीरा गायकवाड, अमित चव्हाण, आशिष मुळ्ये, शीतल हिवराळे, विजया कांबळे, शिल्पा डांगे, अनुदेवी राजपुरोहित, फुलाबाई पवार, स्मिता मिश्रा, मार्था पॉल, जोसेफ दास तसेच सर्व प्रवेशित यांचे योगदान लाभले.

टॅग्स :DiwaliदिवाळीRatnagiriरत्नागिरी