शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 18:54 IST

प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली.

ठळक मुद्दे प्रकल्पग्रस्तांची रेल्वे स्थानकावर निदर्शने, जोरदार घोषणाबाजीरेल रोकोसाठी आलेल्या आंदोलकांना प्रवेशव्दारावर रोखले

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर जोरदार निदर्शने केली.

घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी आंदोलकांना स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने रेल रोको होऊ शकले नाही. याबाबत ९ मे २०१८ रोजी समितीचे पदाधिकारी व अधिकारी यांची बेलापूर मुख्य कार्यालयात बैठक घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.कोकण रेल्वेच्या नोकरीत प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी कोकण भूमी कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली कोकण रेल्वेचे अधिकारी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता, खासदार विनायक राऊत, माजी खासदार नीलेश राणे व अन्य लोकप्रतिनिधी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्याकडून आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. त्यामुळेच कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या ८ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरीत झालेल्या बैठकीत रेल रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.सोमवार सकाळपासून रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त विविध वाहनांनी रत्नागिरीत दाखल झाले. प्रकल्पग्रस्त आंदोलकांची रत्नागिरी रेल्वे स्थानकासमोर मोठी गर्दी झाली. रेल रोकोसाठी ट्रॅकवर जाण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखून धरले. त्यामुळे आंदोलकांनी स्थानकासमोरच निदर्शने सुरू केली. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, यांसारख्या घोषणांनी स्थानक परिसर दणाणून गेला.त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांचे शिष्टमंडळ व कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांची रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. चर्चेत कृती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण व अन्य पदाधिकारी, आंदोलनाला पाठिंबा देणारे बसपाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र आयरे, कॉँग्रेसचे नेते अशोक जाधव यांचा सहभाग होता.प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास पनवेल ते सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यात कोकण रेल्वे मार्गावर रेल रोको करण्यात येईल, असा इशारा अशोक जाधव यांनी बैठकीमध्ये दिला.रेल रोको आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची कुमक वाढविण्यात आली होती. रेल्वे पोलीस, रत्नागिरी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी