शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी -पावसाने शेतीला तारले

By admin | Updated: August 28, 2014 22:24 IST

स्थिती समाधानकारक : उत्पादन मात्र घटण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील भातशेती धोक्यात आली होती. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता. बहुतांश काही ठिकाणी भातरोपांची वाढ खुंटलेली दिसून येत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे भात, नागली, तृणधान्य, भाजीपाला शेतीला तारला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाला उशिराने सुरूवात झाल्याने शेतीची कामे खोळंबली होती. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतीची स्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात भात, नागली, तृणधान्य व भाजीपाला लागवड प्रक्रिया करण्यात आली आहे. पैकी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तसेच २ हजार ९३६ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. तृणधान्य ४१६ हेक्टर क्षेत्रावर, कारळा ३३, भाजीपाला ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आला आहे.लागवडीच्या कालावधीतही पाऊस लांबल्याने लागवड नेहमीपेक्षा उशिरा झाली. लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शिवाय पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील शेतीवर करपा रोग व लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी एकूणच उत्पादकता घटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.हळवी भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो. जूनमध्ये भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, लागवड आॅगस्टमध्ये पूर्ण झाली. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याची प्रक्रिया झाली. हळव्या जातीच्या भाताला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पाऊस गायब झाल्याने भात काही ठिकाणी वाळले. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनावर ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)