शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : नव्या तलाठी सजांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा, प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 15:49 IST

रत्नागिरी जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात नव्या सजांसाठी तलाठ्यांची पदे भरली जाणार असल्याने सध्या अतिरिक्त कामाचा बोजा असलेल्या तलाठ्यांचा हा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देवर्षभरात १०३ सजांमध्ये होणार पदभरतीला प्रारंभतीन टप्प्यात शासन स्तरावर तलाठी पदभरती प्रक्रिया सुरू होणार

रत्नागिरी : जिल्ह्यात १०३ नव्या तलाठी सजांची निर्मिती होणार असून, त्यासाठीची मंजुरीबाबतची प्रक्रिया प्रशासन स्तरावर पूर्ण झाली आहे. तलाठी पदभरती करण्याची प्रक्रिया २०१८ - १९ या वर्षापासून तीन टप्प्यात शासन स्तरावर सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात नव्या सजांसाठी तलाठ्यांची पदे भरली जाणार असल्याने सध्या अतिरिक्त कामाचा बोजा असलेल्या तलाठ्यांचा हा भार कमी होण्यास मदत होणार आहे.ग्रामस्तरावर तलाठी हा महत्त्वाचा घटक असूनही तलाठ्यांची पदे मुळातच कमी आहेत. त्यातच अनेक कामांची जबाबदारी एकाच तलाठ्यांवर टाकली जात असल्याने त्याच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नवीन तलाठी व मंडल अधिकारी पदांची पुनर्रचना करावी, अशी मागणी गेल्या ३२ वर्षांपासून होत होती.

अखेर या मागणीची दखल शासनस्तरावर घेण्यात आली. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने नवीन पद निर्मिती आवश्यकतेबाबत अभ्यास करण्यासाठी व तलाठ्यांचे कामाचे वाढलेले स्वरूप पाहून पदनिर्मितीकरिता नवीन सूत्र ठरवण्यासाठी व त्यानुसार राज्यामध्ये किती पदे निर्माण करणे आवश्यक आहे, याचा अहवाल देण्यासाठी विभागीय आयुक्त (नागपूर) अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने अहवाल शासनाकडे सादर केला होता.

या अहवालाचे निरीक्षण करण्याकरिता महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या उपसमितीनेही अहवाल शासनाकडे सादर केला. शासनाने हा अहवाल स्वीकारून या पदनिर्मितीला मंजुरी दिली. त्यानुसार राज्यात ३१६५ तलाठी पदे निर्मित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पैकी कोकण विभागातील ७४४ तलाठी सजांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १०६ सजांचा समावेश आहे.नव्याने तलाठी सजा तसेच महसूल मंडलांची निर्मिती होणार आहे. यासाठी आता प्रशासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील कोणकोणत्या उपविभागात किंवा तालुक्यात तलाठी सजांची वाढ होईल, याची निश्चिती करण्यात आली होती तसेच आवश्यक सजांची पुनर्रचना किंवा फोड करावी लागेल, हे ठरवण्यासाठी तालुक्यावार समिती स्थापना करण्यात आली.

या प्रक्रियेनंतर प्रत्येक उपविभागात निर्माण करावयाच्या नवीन तलाठी सजात समाविष्ट गावे व सजा मुख्यालयांचा तपशील गोळा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला. या अहवालाला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या जिल्ह्यात २८३ तलाठी सजा असून, नवीन १०३ सजांमुळे आता ही संख्या ४९७ इतकी होणार आहे.नवीन महसूल मंडलांच्या निर्मितीसाठी नवीन निर्माण झालेल्या तलाठी सजाच्या अनुषंगाने सहा तलाठी सजांसाठी एक याप्रमाणे नवीन १८ महसुली मंडले स्थापन करण्यात येणार असून, १५ फेब्रुवारी २०१८ रोजी नवीन महसुली मंडल निर्माण करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दोन टप्प्यात होणार भरतीनव्या तलाठी सजांसाठी पदभरती करताना दोन टप्प्यात केली जाणार आहे. त्यानुसार नागरिक क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रात पहिल्या टप्प्यात पदभरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण क्षेत्रात तीन वर्षासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. २०१८ - १९ मध्ये अ व ब वर्गातील गावांसाठी, २०१९-२०२० मध्ये ग्रामीण भागातील तर २०२० - २०२१ मध्ये तटीय क्षेत्रात भरती होणार आहे. या भरतीमुळे महसूल खात्यातील कर्मचाºयांवर असलेला सध्याच्या कामाचा ताण काहीअंशी कमी होणार आहे.तलाठी पदे मुळातच कमीग्रामस्तरावर तलाठी हा महत्त्वाचा घटक असूनही तलाठ्यांची पदे मुळातच कमी आहेत. सध्या तलाठ्यांची ३९९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३३५ पदे भरलेली आहेत, तर ६४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या एकाच तलाठ्याकडे दोन - तीन गावांचा कारभार सोपवला जात आहे.

ही पदे भरण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. आता या पाठपुराव्याला यश आल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. यापूर्वी तलाठ्यांशी संबंधित असलेले अनेक व्यवहार रखडत होते, ते आता तत्काळ मार्गी लागणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtahasil chowkतहसील चौक