शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:18 IST

राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानरत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा सहभागी नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

शोभना कांबळेरत्नागिरी : राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली.सध्या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत डिसेंबरअखेर स्वच्छ शहर हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत राज्यातील सर्व शहरांमध्ये सातत्य राहावे, या दृष्टीने राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गातील महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषदांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा मानला जाणार आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे तसेच शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविणे आणि स्वच्छ महाराष्ट्रमध्ये नागरिकांचा सांघिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने जागृती करणे, या उद्देशाने आता स्पर्धा आयोजित केली आहे.

स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत सहभागी होणे सर्व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींना बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अ, ब आणि क वर्गातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.

रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि दापोली, लांजा, गुहागर, देवरूख आणि मंडणगड या पाच नगरपंचायती या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या नगरपरिषद अथवा नगरपंचायतींच्या अखत्यारीतील प्रत्येक शहरासाठी ही स्पर्धा बंधनकारक आहे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्ड या स्पर्धेत सहभागी होणार आहे.या कालावधीत अ, ब आणि क अशा तीनही वर्गांतील नगरपरिषदांची पाहणी मार्च महिन्यात करण्यात येणार आहे. पाहणी करण्यासाठी प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या स्तरावर त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करून वॉर्डची तपासणी करून घ्यावी. हा अहवाल २५ मार्चपर्यंत राज्य शासनाकडे पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.महानगरपालिका स्तरावर अ,ब, क आणि ड अशा वर्गांसाठी बक्षिसे दिली जाणार आहेत. अ व ब गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ५० लाख, ३५ लाख आणि २० लाख तर क व ड गटासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

नगरपरिषद स्तरावर अ, ब आणि क अशा तीन वर्गांसाठी देण्यात येणारी बक्षिसे : अ वर्गासाठी पहिली तीन बक्षिसे अनुक्रमे ३० लाख, २० लाख आणि १५ लाख. ब वर्गासाठी २० लाख, १५ लाख आणि १० लाख, क वर्गासाठी १५ लाख, १५ लाख आणि ५ लाख रूपये अशी देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरी