शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

रत्नागिरीत नगराध्यक्ष निवडणुकीची तयारी ! - अनेकजण स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:29 IST

लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी

ठळक मुद्दे- लोकसभा निकालानंतर राहुल पंडित देणार राजीनामा ?

प्रकाश वराडकर । रत्नागिरी : लोकसभा निवडणूक काळात रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित तीन महिन्यांच्या रजेवर गेले होते. या काळात नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्याकडे देण्यात आला होता. रजा संपल्यानंतर राहुल पंडित यांनी नगराध्यक्षपद स्वीकारले. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा असून, थेट निवडणूकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.रत्नागिरीचे नगराध्यक्षपद सेनेचे राहुल पंडित यांना पक्षाने दोन वर्षांसाठी दिल्याची व त्यानंतरच्या कालावधीत बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली जाणार अशी कुजबूज गेल्या दोन वर्षांपासून होती. मात्र, त्याबाबत सेनेच्या नेत्यांनी मौन पाळले होते. पंंडित यांची दोन वर्षे पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने पंडित यांनी रजेवर जाण्याचा मार्ग पक्षाने काढला. रजा संपून आता पंडित यांनी पदभार स्वीकारला. मात्र, ते प्रत्यक्ष काम करीत नसल्याने नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षातूनच सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ आहे. या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांचे नाव सेनेतर्फे पुढे येत आहे. शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा असल्याने सध्या शहरात या थेट निवडणुकीसाठी सेनेतर्फेही तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून गेली अनेक वर्षे काम पाहणारे बंड्या साळवी हे डॅशिंग नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तालुक्यात आपल्या संघटन कौशल्याने शिवसेनेची चांगली बांधणी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी धडाडीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सेनेतर्फे साळवी यांनाच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सेनेतील ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, स्मितल पावसकर यांचीही नावे चर्चेत आहेत.थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार याची कल्पना राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांना होती. त्यामुळे उमेश शेट्ये निवडणूक लढविणार होते. मात्र, त्यांचे अकाली निधन  झाले. त्यामुळे आता शेट्ये यांची सून नगरसेविका कौसल्या शेट्ये  तसेच  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची नावे चर्चेत आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यपद निवडणुकीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणूक निकालावर अवलंबून राहणार आहे. कुवारबाव पॅटर्न वापरणार!रत्नागिरीत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक  होणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच त्यावेळी सेना-भाजपची युती असेल का, हा मुद्दाही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेना विरूद्ध इतर सर्व पक्ष असा फॉर्म्युला कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आला. तेथे सेनेचा पराभव झाला. तसाच फॉर्म्युला रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राबविला जाईल का, याचीही चर्चा आता यानिमित्ताने सुरू झाली आहे.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक