शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक :सेनेविरोधात बाकी पक्ष एकच उमेदवार देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:44 IST

राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.

ठळक मुद्देसेनेविरोधात बाकी पक्ष एकच उमेदवार देणार?रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत कुवारबाव पॅटर्नची जोरात चर्चा

रत्नागिरी : राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे.

आता थेट निवडणुकीत सेनेला शह देण्यासाठी कुवारबाव ग्रामपंचायतीत सेना विरोधात सर्व पक्षीय आघाडीचा यशस्वी झालेला फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेला आघाडीशी कडवी झुंज द्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रत्नागिरीचे सेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी गेल्याच आठवड्यात नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रत्नागिरीचे नगराध्यक्षपद रिक्त झाले आहे. पंडित हे राजीनामा देणार व सेनेचे तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष बंड्या साळवी हे थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. त्यानुसार पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्ष निवडणुकीबाबत रत्नागिरीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे बंड्या साळवी हेच उमेदवार असतील. त्यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली जाईल, असे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.दोन वर्षांपूर्वीही थेट नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या बंड्या साळवी यांना दोन वर्षांनंतर संधी देण्याचा शब्द लेखी पत्रातून देण्यात आला होता.

त्यानुसार लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी शहरात शिवसेनेला मताधिक्य असल्याने स्थिती चांगली आहे, हे जाणूनच पक्षाने पंडित यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला, अन त्यांनी राजीनामा दिला. मात्र, पंडित यांना पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले असताना त्यांचा राजीनामा का घेतला, असा सवालही काही घटकांकडून केला जात आहे.दरम्यान, या विषयावरून शहरात रणकंदन माजले असून, सेनेला थेट नगराध्यक्ष निवडणुकीत पराभवाचे पाणी पाजायचेच, असा निश्चय काही घटकांनी केला आहे. त्यासाठी शहरातील दोन मोठे गट (घटक) एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आघाडीचे किंवा सर्व विरोधकांचे पुरस्कृत असे उमेदवार निश्चित करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यामध्ये सेनेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव चर्चेत आहे.

शहरातील एक मोठा गट (समूह) सेनेच्या विरोधात सक्रीय झाला असून, आपल्या गटाचा स्वतंत्र उमेदवारही उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे. पंडित यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप निवडणूक विभागाने थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम, तारीख जाहीर करणे बाकी आहे. 

रंगतदार लढतनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बंड्या साळवी हे उमेदवार असतील काय, ते उमेदवार असतील तर त्यांच्याविरोधात कोण-कोण उमेदवार असतील, निवडणुकीचे डावपेच काय असतील, माजी नगराध्यक्ष दिवंगत उमेश शेट्ये यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा राष्ट्रवादीला होईल काय, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक सोपी नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी