शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मोरवणे गावाने जपलीय ‘सैनिकी’ परंपरा, आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली सेवा 

By संदीप बांद्रे | Updated: April 5, 2023 13:31 IST

मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू

संदीप बांद्रेचिपळूण : तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि एक-एक करत मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू झाले. आजही या गावातील तब्बल ३० जण भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहेत, तर आतापर्यंत सुमारे ३०० हून अधिक जणांनी देशसेवा केली आहे. त्यामुळे मोरवणे गावाला सैनिकांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग हा भारतीय सैन्यासाठी ओळखला जातो. मोरवणे गावाने भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. १९४९ साली येथील भास्करराव शिंदे हे सर्वप्रथम सैन्यदलात रुजू झाले. शिपाईपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. सैन्यात काम करण्यास व देशसेवा बजावण्यात मोठा वाव आहे.आपला कोकणी माणूस कष्टाळू आहे. तो हे सहज करू शकतो हे भास्करराव शिंदे यांनी त्यावेळी हेरले आणि गावातील तरुणांना देशसेवेचे धडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. पुढे ‘बॉईज बटालियन’च्या माध्यमातून त्यांनी येथील १७ वर्षीय तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि इंडियन आर्मीत एक-एक तरुणाला जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दुसऱ्या बाजूला स्वतः त्यांनी भारतीय सैन्यदलात यशाची एक-एक पायरी पादाक्रांत केली.इंडियन प्यारामध्ये मोरवणेचे भास्करराव शिंदे सर्वोत्तम जम्पर ठरले होते. सुमारे ३५ वर्षे त्यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. तोपर्यंत मोरवणे गावातील अनेक तरुण सैन्यदलात रुजू झाले होते, तर मोरवणे गावातील सुमारे ३०० हून अधिक जण भारतीय सैन्यात दाखल झाले. आजच्या घडीला तब्बल ३० हून अधिक जण भारतीय सैन्यात महत्त्वाच्या विविध पदांवर देशसेवा बजावत आहेत. त्यापैकी सुभेदार अजय ढगळे हे देशसेवा करताना शहीद झाले.

आतापर्यंत मोरवणे गावातील ३०० हून अधिक जणांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. त्यातील प्रत्येकाने युद्धाचा सामना केला आहे. मात्र, युद्धात जखमी होऊन नंतर कालांतराने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत; पण गावातील एकाही सैनिकाचा युद्धात मृत्यू झालेला नाही. ग्रामदेवतेचा हा प्रसाद असून, त्या विश्वासावर गावचा प्रत्येक सैनिक देशसेवेचे काम करीत असतो.  - शरद शिंदे, माजी सैनिक, मोरवणे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndian Armyभारतीय जवान