शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:43 IST

गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवररत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता

रत्नागिरी : गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.यावर्षी ३३७३ सेंटीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले आहे. मात्र सप्टेंबरपासूनच पाऊस गायब असून पावसाळ्यात तीव्र ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. आॅक्टोबरमध्ये अधूनमधून पडलेला पाऊस यामुळे आंबा कलमांना पालवी मोठ्या प्रमाणात आली आहे. हंगामापूर्वी उत्पन्न मिळविण्यासाठी कल्टार सारखी संजीवके वापरली जातात. कल्टार वापरूनसुध्दा झाडांना पालवीच आली आहे.साधारणत: ज्यावेळी कलमांची जूनी पाने पानगळ होते, त्याचवेळी नवीन पालवी येण्यास प्रारंभ होतो. वास्तविक सप्टेंबर मध्ये पालवी येणे अपेक्षित होते. परंतु आॅक्टोंबरमध्येच पालवीचे प्रमाण वाढले आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी पालवी जून होणे गरजेचे आहे. त्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. जर थंडी चांगली असेल तर मात्र मोहोर लवकर येण्याची शक्यता आहे. परंतु आॅक्टोबर निम्मा झाला तरी थंडी गायब आहे. धुके मात्र पडू लागले आहे.

शेतकरी थंडी वाढावी अशी अपेक्षा करीत आहेत. आॅक्टोबरमध्ये जर मोहोर आला तर फळधारणा होवून आंबा मार्चमध्ये बाजारात दाखल होतो. समुद्र किनारपट्टी लगतच्या मोजक्याच झाडांना मोहोर आला आहे. मोहोराचे प्रमाण तर अवघे दोन टक्के आहे. थंडी वाढली तरी पालवी जून होवून मोहोर डिसेंबर उजाडणार आहे.

डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचा आंबा तयार होवून बाजारात येण्यासाठी एप्रिल उजाडणार आहे. एकूणच सध्या तरी पालवी जून होण्यासाठीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. आंबा एकाचवेळी तयार होवून बाजारात आला तर तर घसरण्याची भिती आहे. पालवीमुळे यावर्षीसुध्दा आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. एकूणच जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमी झालेला पाऊस व अधिकत्तम उष्णता यामुळे झाडांना पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यासाठी नैसर्गिकत: अडीच ते तीन महिने लागतात. आॅक्टोबर निम्मा झाला असून सर्वत्र पालवीच पालवी आहे. एकूण ९८ टक्के पालवीचे प्रमाण आहे. दरवर्षी मार्चमध्ये आंबा बाजारात विक्रीस येतो परंतु यावर्षी आंबा बाजारात येण्यास एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. दरवर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादनामध्ये घट होत असून शेतकऱ्यांना त्याची आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. यावर्षीसुध्दा पिक लांबण्याची शक्यता आहे.एम.एस.गुरव, शेतकरी.

शेतकऱ्यांकडून आंब्याला लवकर मोहोर व फळे येण्यासाठी वापरली जाणारी विविध कंपनीची पिक संवर्धन संजिवके वापरण्यात येतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४० हजार लिटर कृषी संजीवकांची विक्री होते. विविध कंपन्याची पिक संवर्धन संजिवके वापरली जातात.

कृषी संजीवकांच्या किमंती भरमसाठ असल्या तरी शेतकरी ती संजीवके वापरतात. यावर्षी संजीवके वापरलेल्या झाडांबरोबर न वापरलेल्या झाडांनासुध्दा मोहोर आला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संजीवकांसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांचा वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी