शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरी : सेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:23 IST

राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.

ठळक मुद्देसेनेच्या दणक्याने महावितरण जाग्यावरग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरूराजापुरातील महावितरणचे कार्यालय स्थलांतरीत केल्याने गैरसोय

राजापूर : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या दणक्यानंतर महावितरण कंपनीने ग्राहकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी राजापूर पंचायत समितीच्या आवारात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते व माजी आमदार गणपत कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडले.यापूर्वी महावितरण कंपनीच्या आदेशानुसार तालुक्यातील खासगी जागेत भाड्याने कार्यरत असलेली महावितरणची कार्यालये स्वमालकीच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी असलेली भाग एक व दोन अशी कार्यालये शहरापासून दोन किमी अंतरावरील दूर अशा महावितरण कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली होती.महावितरण विभागाच्या या निर्णयाने राजापूर शहरातील ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू लागला होता. महावितरणशी संबंधीत येत असलेल्या अडीअडचणींबाबत दोन किमी दूर अंतरावर जाताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. ही स्थलांतरीत केलेली कार्यालये मूळ जागेत पुन्हा यावीत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते.त्यासाठी आमदार राजन साळवी यांच्यासह विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन ग्राहकांची कशी अडचण येत आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

त्यामुळे संतापलेल्या वीज ग्राहकांनी व सर्व पक्षीयांच्या वतीने दोन दिवसांपूर्वी महावितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आली होती. तत्पूर्वी आमदार राजन साळवी यांनीदेखील संबंधीत महावितरण कंपनीला चांगलाच दणका दिला होता.त्यामुळे महावितरण प्रशासन हादरले. नमते घेताना शहरवासीयांची व तालुक्यातील जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.

त्याला सकारात्मक प्रतिसाद सभापती सुभाष गुरव यांनी देताना पंचायत समितीच्या आवारातील वापरात नसलेल्या गोडाऊनची इमारत तत्काळ देण्याचा निर्णय घेतला व ती स्वच्छ करून जनतेच्या सेवेसाठी विनामोबदला दिली. त्यानंतर महावितरण केंद्राचे ग्राहक तक्रार निवारण केंद्र त्याठिकाणी आणले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण