शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:28 IST

आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

ठळक मुद्दे दिवसाला महिला, मुलींवर अत्याचार, विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे : चित्रा वाघकोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने महिला प्रदेशाध्यक्ष रत्नागिरीत

रत्नागिरी : आज दिवसाला अनेक महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत़ या विकृतीला सरकार पाठीशी घालीत आहे़ त्यामुळे शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़. 

महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ कोकण संपर्क दौऱ्यानिमित्ताने रत्नागिरीत आल्या होत्या़ त्या पुढे म्हणाला, राज्य सरकारने गेली चार वर्षे केवळ आश्वासने दिली़ त्या आश्वासनाचे कुठेही फलीत झालेले आपल्याला पहायला मिळत नाही़ चार वर्षे पूर्ण झाल्याने सरकारकडून राज्यात महागाई वाढली, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यांचे सेलीबे्रशन सुरु आहे. देशात आणि राज्यात फार भीषण परिस्थिती असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.गोरगरिबांच्या तोंडचा गोड घास या सणासुदीच्या दिवसांत पळवून नेण्याचं पाप या सरकारने केलंय़ हेच अच्छे दिन आहेत का, असे विचारण्याची आज वेळ आली आहे़ रेशन दुकांनावर गहू, तांदूळ, साखर नाही़ ज्या ठिकाणी गहू, तांदूळ आहे तेथे तूरीची डाळ जबरदस्तीने गरीबांच्या माथी मारली जात आहे, अशी परिस्थिती आहे़.

या सरकारचं ५० टक्के जनसंख्येवर विश्वास राहिलेला नाही़ कारण आता बायोमेट्रिक पध्दत आणली़ या आधी धान्य सर्वांना मिळायचं़ आता मात्र थमइंप्रेशनशिवाय धान्य मिळत नाही़ बरेच लोक वयोवृध्द आहेत़ ते रेशन दुकानांपर्यंत येवू शकत नाहीत़ अशानाही तेथेपर्यंत जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केली असल्याचा आरोप वाघ यांनी केला़.

विकृतीला शाळकरी, कॉलेजच्या मुली याला बळी पडत आहेत़ असे अनेक गंभीर प्रश्न आहेत़ असे अनेक प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत़ कशा पध्दतीने हे सरकार फसवे आहे़ हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे़ तसेच जनतेमध्ये या सरकारकडून फसवणुक झाल्याची भावना निर्माण झाल्याचे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे़ आश्वासने पूर्ण करु शकलेले नाही़ म्हणूनच येणाऱ्या दिवसांमध्ये परिवर्तन निश्चित दिसेल़ आणि या सरकारला त्यांची जागा दाखविण्याचे काम ही महाराष्ट्राची जनता करील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला़,यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, अल्पसंख्यांक नेते बशीर मुर्तुझा, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, नगरसेवक मुसा काझी आणि इतर कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या़

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघRatnagiriरत्नागिरी