शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाची नोकरी, संजय गुप्ता यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:54 IST

प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाची नोकरी, संजय गुप्ता यांचे आश्वासनकोकण रेल्वे प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न लागणार मार्गी

रत्नागिरी : प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे.प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी घेतली आहे. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात नीलेश राणे यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.त्यानुसार नीलेश राणे यांनी रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यासंदर्भात चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासनाकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन गुप्ता यांनी दिले असून, त्याची अंमलबजावणी तत्काळ केली जाईल, असेही त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले.या बैठकीनंतर निलेश राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. त्यावेळी प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाप्रमाणे काम मिळेल. त्याप्रमाणे प्रत्येकाने कामाला सुरूवात करावी, असे सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी