शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:31 IST

केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पाच राज्यात प्रथम, देशात दहावा क्रमांक सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी नगर परिषदेची उत्तम कामगिरी

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या ह्यस्वच्छ भारतह्ण सर्वेक्षणात रत्नागिरी नगर परिषद एक लाख लोकसंख्या असलेल्या गटात पश्चिम विभागातील पाच राज्यात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवरही दहावा क्रमांक मिळविला आहे. या नगर परिषदेला स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे.दिल्ली येथून गुरुवारी या स्वच्छ भारत सर्वेक्षणातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. अर्बन अफेअर्स अँड हाऊसिंग मंत्रालयातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या दिल्लीतून ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. स्वच्छ भारत सर्वेक्षणात पाच राज्यात सर्वप्रथम आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख नागरी संख्येच्या गटात स्थान देण्यात आले होते.या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२ शहरांची निवड करण्यात आली. रत्नागिरी शहराने सलग तिसऱ्या वर्षी यात स्थान प्राप्त केले आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणी संकलन करुन त्याचे एकत्र गोळा झाल्यानंतर केलेले वर्गीकरण, शहरात १०० टक्के कचरा संकलन, कचऱ्यातून खतनिर्मिती, प्लास्टिकवर प्रक्रिया तसेच घातक कचऱ्यावर प्रक्रिया आदी प्रकल्प उभे केले आहेत. शहराने ओडीएफ ++ मानांकन मिळविले असून, कचरा मुक्तिबाबत शहराला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.शहराचे प्रथम नागरिक प्रदीप तथा बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिक, पदाधिकारी, शाळा, संस्था, एनजीओ तसेच विविध माध्यमांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले. कचरा संकलनात रत्नागिरी नगर परिषदेचे काम विशेष कौतुकास्पद झाले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका