शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :फेथाई वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:24 IST

सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देफेथाई वादळी वाऱ्याचा मासेमारीला फटकामासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक

रत्नागिरी : सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही सागरी क्षेत्रातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाता मच्छीमारांनी बंदरांमध्येच नौका नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.१ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारी, तर १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, या हंगामातील सागरी मासेमारी सुरू झाल्यापासून काहीना काही नैसर्गिक आपत्तीला मच्छीमारांना सामोरे जावे लागले आहे. वादळी वाऱ्यामुळे याआधीही मासेमारी ठप्प झाली होती. त्यानंतर गोवा सरकारने मासळी आयातीवर बंदी घातल्यानेही जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

राज्यातील व परराज्यातील अन्य बाजारपेठा शोधून तेथे मासळी पाठविण्याचा पर्याय मासेमारांनी शोधलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सागरी क्षेत्रात वादळी वेगवान वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक बनले आहे.या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर, जयगड बंदर, हर्णै बंदर तसेच अन्य बंदरांमध्येच मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीच्या मिरकरवाडा मासेमारी बंदरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या संख्येमध्ये मासेमारी नौका नांगरण्यात आल्या आहेत.

वादळी वाऱ्यामुळे सागर खवळलेला असून, लाटांचा जोरही वाढलेला आहे. त्यामुळेच मच्छीमारांनी मासेमारीसाठी सागरात जाणे टाळले आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये मासळीची आवक थांबली आहे. मुंबई, अलिबाग येथून येणाऱ्या मासळीची जिल्ह्याच्या बाजारपेठांमध्ये सध्या विक्री केली जात आहे. फेथाई वादळामुळे वादळी हवामान आणखी दोन दिवस राहण्याची भीती व्यक्त होत आहे.पर्ससीन मासेमारीला केवळ चार महिनेच परवानगी देत अन्य कालावधीत पर्ससीन मासेमारीवर शासनाने बंदी घातली आहे. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर अशी परवानगी आहे. त्यामुळे येत्या ३१ डिसेंबरला म्हणजेच आणखी १३ दिवसांनी पर्ससीन मासेमारी बंद करावी लागणार आहे. नैसर्गिक संकटांमुळे पर्ससीन मासेमारीचा बराच कालावधी मासेमारीविना गेला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडूकडून आता आंध्रप्रदेशातील मच्छलीपटनम ते काकीनाडा दरम्यान वळवली आहे. या चक्री वादळाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातही दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला आहे. किनारपट्टीवर वादळी वारेही जोरात वाहात आहेत. त्यामुळेच सागरी मासेमारीवर या वादळी वाऱ्याचे सावट पसरले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग