शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:19 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण नाटक सादर करण्यात येणार आहे. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नांदेड येथे दि. २० रोजी होणाºया स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ बुधवारी सायंकाळी नांदेडकडे रवाना झाला.

ठळक मुद्देनाट्य स्पर्धेसाठी रत्नागिरी विभागाची टीम नांदेडला रवानाकामगार कल्याण समितीच्या स्पर्धेत सादर होणार सलवा जुडूम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण नाटक सादर करण्यात येणार आहे. शंकरराव चव्हाण नाट्यगृह, नांदेड येथे दि. २० रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ बुधवारी सायंकाळी नांदेडकडे रवाना झाला.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रत्नागिरी विभाग व राज्य परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभाग यांच्यातर्फे दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदविला जातो. वेळोवेळी रत्नागिरी संघाने स्पर्धेत बक्षीसही मिळविले आहे.

यावर्षी दोन अंकी सामाजिक वास्तववादी नाटक सलवा जुडूम सादर केले जाणार आहे. नाटकाचे लेखन इरफान मुजावर यांनी केले असून, दिग्दर्शन राजेश मयेकर, निर्मितीप्रमुख विभाग नियंत्रक सुनील भोकरे आहेत.निर्मिती सहाय्यक उपयंत्र अभियंता रमाकांत शिंदे, विभागीय भांडार अधिकारी भक्ती वेल्हाळ, सूत्रधार कामगार अधिकारी प्रवीण पाटील आहेत. प्रकाश योजना, अनिष शिवलकर, पार्श्वसंगीत रवींद्र तेरवणकर, नेपथ्य प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, इस्माईल काजी, रंगमंच व्यवस्था अमित लांजेकर, रवींद्र तेरवणकर, वेषभूषा कृष्णकांत साळवी, प्रसाद मोहिते, रंगभूषा अमित लांजेकर, रसिका गावडे करणार आहेत.नाटकामध्ये कृष्णकांत साळवी (दासू), नंदकुमार भारती (पुनित), शैलेंद्र हातिसकर (कमांडर), प्रशांत आडिवरेकर (श्याम), राजेश कीर (कॅप्टन), अमित लांजेकर (जवान-२), राजेश मयेकर (जवान-३), संजय डोर्लेकर (मुखिया), प्रियांका झोरे (आक्कु), प्रदीप घवाळी (नथू), संतोष खरात (चित्रा), प्रवीण बापर्डेकर, विजय मेस्त्री, रवींद्र तेरवणकर, दिलीप सुर्वे, ज्ञानेश मिरजकर, विजय पडते, रसिका गावडे, प्रियांका झोरे (गावकरी), सुप्रिती शिवलकर (वेदी), प्रमुख भूमिका बजावणार आहेत.

 

टॅग्स :NatakनाटकRatnagiriरत्नागिरी