शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

रत्नागिरी जिल्ह्यात

By admin | Updated: November 2, 2016 23:21 IST

एकाचा निर्णय प्रलंबित : आता प्रतीक्षा माघारीची

रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी दाखल झालेल्या एकूण ४९६ अर्जांपैकी ४८२ अर्ज वैध ठरले असून, एकाबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात नगरसेवक पदासाठीचे १० अर्ज अवैध ठरले असून, एका अर्जाचा निर्णय प्रलंबित आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्जांपैकी तीन अर्ज बाद झाले आहेत. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३० जागांसाठी एकूण १२० अर्ज आले होते. त्यापैकी नऊ अर्ज अवैध ठरले असून, १११ अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी १२ पैकी तीन अर्ज अवैध ठरले असून, नऊ अर्ज वैध ठरले आहेत. चिपळूणमध्ये नगरसेवकांच्या २६ जागांसाठी ११३ अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज दाखल झाले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. खेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बुधवारी ६२ अर्ज वैध ठरले असून, एका अर्जाचा निकाल काही कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दापोली नगरपंचायतमध्ये १७ जागांसाठी १०८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीवेळी एक अर्ज अवैध ठरला असून, उर्वरित १०७ अर्ज वैध ठरले आहेत. राजापुरात १७ नगरसेवकांच्या जागांसाठी ६६ आणि नगराध्यक्षाच्या जागेसाठी तीन, असे एकूण ५२ उमेदवारांचे ६९ अर्ज आले होते. बुधवारी हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या नगरसेवकांच्या १०७ जागांसाठी आलेल्या ४७३ अर्जांपैकी ४५९ अर्ज वैध ठरले असून, १० अर्ज अवैध ठरले आहेत. खेडमधील एका अर्जाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्षांच्या चार जागांसाठी आलेल्या एकूण २६ अर्जांपैकी २३ अर्ज वैध, तर तीन अर्ज अवैध ठरले आहेत. बुधवारी छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने निवडणुकीच्या रिंगणातून कोण माघार घेणार आणि कोण लढणार, हे स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)