शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
4
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
5
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
6
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
7
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
8
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
9
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
10
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
12
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
13
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
14
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
15
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
16
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
17
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
18
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
19
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
20
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला

रत्नागिरी जिल्ह्यात सारीसह इलीचे तब्बल २,३६१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 17:51 IST

CoronaVirus, hospital, Ratnagiri माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात २,३६१ सारी आणि इलीचे रुग्ण, तर २९१ कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम, सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी१५ सप्टेंबरपासून ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये

रत्नागिरी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात २,३६१ सारी आणि इलीचे रुग्ण, तर २९१ कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती महेश म्हाप व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोविड रुग्ण शोधणे, हा महत्त्वाचा उद्देश समोर ठेवून १५ सप्टेंबरपासून ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यास सुरूवात झाली आहे. तपासणी दरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे १ लाख १२ हजार ७९ रुग्ण आढळून आले. या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येमध्ये लक्षणीय घट आढळून येत आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला जिल्ह्यातील जनतेने सहकार्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाने धन्यवाद दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.दोन हजार कर्मचारीपहिली फेरी १० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये १५ लाख ४२ हजार ६१२ लोकसंख्या आणि ४ लाख ४० हजार ५७२ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ६८६ पथकांमध्ये २,०२९ कर्मचारी कार्यरत होते. १४ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दुसरा टप्पा राबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी