शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा रुग्णालय पडणार आजारी

By admin | Updated: September 9, 2014 23:46 IST

करार संपुष्टात : अस्थायी तिघे डॉक्टर्स होणार कमी

रत्नागिरी : येत्या आठवडाभरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन अस्थायी डॉक्टर्सचा करार संपुष्टात येणार असून, त्यामुळे रुग्णालयातील रिक्त पदांची जंत्री आणखी वाढणार आहे. करार संपलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुनर्नियुक्ती न देण्याच्या शासन निर्णयामुळे या तीनही डॉक्टर्सना वाढीव मुदत मिळू शकत नाही. त्याचा फटका आता सामान्य रुग्णाला बसणार आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या अस्थायी डॉक्टर्सना पुन्हा वाढीव नियुक्ती न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा फटका रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला बसणार आहे. रुग्णालयातील वातावरणामुळे व राजकीय दबावामुळे जिल्हा रुग्णालयात परजिल्ह्यातील डॉक्टर्स येण्यास अनुत्सूक असतात. त्यातच अस्थायी डॉक्टर्सचा करार न वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा रुग्णालयातून सर्वसामान्यांना अत्यावश्यक सेवा मिळू लागल्या आहेत. सध्या रुग्णालयातील काही पदे रिक्त असतानाही सेवेत असलेले कर्मचारी व अधिकारी आपापल्या परीने रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अस्थायी डॉक्टर्सच्या संपुष्टात येणाऱ्या करारामुळे रुग्णालयाचेच आजारपण वाढण्याची शक्यता आहे.या रुग्णालयात डॉक्टर्सची ३२ पदे मंजूर असून, सध्या १४ जागा रिक्त आहेत. १८ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फ त रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाह्य रुग्ण विभागात सेवेसाठी नेमता येत नसल्याने या विभागातील सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असल्याने या ठिकाणी अन्य डॉक्टर्सची नियुक्ती होणेही अशक्यप्राय बनले आहे. त्यामुळे पुढील दोन महिनेतरी डॉक्टर्सची नियुक्ती रखडणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाचे कामकाज कोलमडणार आहे. (प्रतिनिधी)तिघा डॉक्टर्सचा करार येणार संपुष्टात.शासनाच्या निर्णयामुळे करार वाढवता येणार नाही.रत्नागिरीत येण्यास अनुत्सूक असणाऱ्या डॉक्टर्समुळे रिक्त पदे वाढणार.