शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, मतदारांची नोंद किती...वाचा 

By शोभना कांबळे | Updated: November 9, 2023 16:29 IST

येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून या यादीत एकूण १३,३१,४९३ मतदारांची नोंद झाली आहे. यात पुरुष मतदार ६,४२,४७८, तर स्त्री मतदारांची संख्या ६,८९,००३ इतकी असून १२ अन्य मतदार आहेत. येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तयार हव्यात, या दृष्टीने मतदार यादी अद्यावत करण्यासाठी जिल्ह्यात मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रम राबविण्यात आला. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात घरोघरी जाऊन मतदारांचे बीएलओमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यातील नावांमधील दुरुस्ती, नाव कमी करणे, नावांची नोंदणी तसेच पत्ताबदल आदी प्रकारे मतदार यादी अद्यावत करून तिची २१ ऑक्टोबर रोजी प्रारूप प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यानुसार या यादीत १३ लाख ३१ हजार ४९३ मतदारांची नोंद झाली आहे.

२१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हरकती दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी झाल्यानंतर येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहितीही राहुल गायकवाड यांनी दिली.गेल्या वर्षी अंतिम यादीत १३ लाख ३० हजार ९४० मतदारांचा समावेश होता. सध्या प्रारूप यादीत मतदारांची संख्या वाढलेली दिसत आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम यादी मतदारांची संख्या निश्चित होईल, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVotingमतदान