शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: April 1, 2017 18:32 IST

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना, २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागिल आर्थिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात २९५ बायोगॅस उभारण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.ग्रामीण भागातील चुलींना पर्याय म्हणून बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना, यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. शिवाय कंपन्यांकडून गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचाच ठरत आहे. त्यासाठी शासनाने बायोगॅस प्रकल्क उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफूटासाठी ९ हजार रुपये देण्यात योतत़ त्याला शौचालय जोडल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्या जनावर असणे अवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आतापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून २७० बायोगॅस प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली. एकीकडे मागेल त्याला बायोगॅस, तर दुसरीकडे या मागणीसाठी जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येवून बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २७० बायोगॅस आणि २०१६-१७ मध्ये २९५ बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने कृषी विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे़