शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : मत्स्यालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे तोशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:33 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देरत्नागिरी मत्स्यालयातील अस्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे तोशेरेमत्स्य व्यवसायाची पाहणी : अचानक दौऱ्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ

रत्नागिरी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरातील मत्स्यालय तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे येथील अधिकारी, कर्मचारी यांची तारांबळ उडाली. यावेळी या परिसरात अस्वच्छता दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.रत्नागिरीचेजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. बोर्डिंग रोड येथील अध्यापक महाविद्यालय तसेच फणशी परिसरातून परटवणेकडे चालत जाताना त्यांनी नगर परिषदेच्या खचलेल्या रस्त्याची पाहणी केली.

परटवणे येथील पुलाचे अनेक वर्षे काम न झाल्यामुळे त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. या पुलावर सदैव वाहतूककोंडी होते. भविष्यात जड वाहनांमुळे या पुलाला धोका पोहोचू नये, यासाठी हा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी खेडेकरवाडीतून पालकर हॉस्पिटल चौकात बंद असणाऱ्या पोलीस चौकीची दुरवस्था पाहिली व तेथून सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाला भेट दिली. रत्नागिरी जिल्ह्याचे हे प्रमुख कार्यालय असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छीमार ये-जा करत असतात.

या ठिकाणी असणारे खेकडा संवर्धन, कोळंबी प्रकल्प याची पाहणी करताना येणाऱ्या मच्छीमारांना ते कसे फायदेशीर ठरतील, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मॉर्निंगवॉकच्या निमित्ताने रत्नागिरी मत्स्यालयाला भेट देऊन तेथे असणारे विविध जातीचे मासे आणि देवमाशाची माहितीही घेतली.या मत्स्यालयासंदर्भात त्यांनी पर्यटकांचा ओढा वाढावा, यासाठी आवश्यक त्या सूचना केल्यात्यानंतर मिऱ्या ते कोल्हापूर या महामार्गावरून जाताना शहरातील अनेकांनी टाकलेला कचरा त्यांना आढळून आल्याने त्यांनी स्वच्छतेसंबंधी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे अनेकांची मात्र तारांबळ उडाली.अस्वच्छतेबद्दल जिल्हाधिकारी नाराज...शासनाने नुकताच स्वच्छता पंधरवडा राबवला. परंतु या कार्यालयाकडून स्वच्छता न झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वत्र शासनाकडून स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे. मात्र, अनेक शासकीय कार्यालयातून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या  मार्निंग वॉकच्या निमित्ताने निदर्शनास आले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार