शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यासाठी शनिवार घातवार , पाच अपघातात ८ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 07:02 IST

जिल्ह्यासाठी शनिवार घातवारच ठरला. पाच वेगळवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आठजण ठार झाले तर चारजण जखमी झाले. साखरपा येथे कार झाडावर आदळून चार जण तर खेरशेत

रत्नागिरी : जिल्ह्यासाठी शनिवार घातवारच ठरला. पाच वेगळवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आठजण ठार झाले तर चारजण जखमी झाले. साखरपा येथे कार झाडावर आदळून चार जण तर खेरशेत (चिपळूण) येथे डंपरच्या धडकेने एका लहान मुलीसह तीन पादचारी महिला ठार झाल्या. त्याचदरम्यान खेड येथे जीपच्या धडकेने एका चार वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. त्याखेरीज अन्य दोन अपघातात चारजण जखमी झाले आहेत.साखरपा येथे मारूती स्वीफ्ट कार झाडावर आदळून अमोल अजित जोशी व वैभव हेमंत डांगे हे जागीच ठार झाले तर नेहल हंमेत पाटील (३१) आणि समृद्धी अमोद जोशी (२७) यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे सर्वजण डोंबिवली येथील असून, ते कणकवलीला जात होते. पुणेमार्गे ते आंबा घाटातून येत असताना हा अपघात झाला.मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे डंपरने एका मुलीसह अन्य तीन पादचारी महिलांना धडक दिली. त्यात गीता रामू किंजळकर (५०) या जागीच ठार झाल्या. जिया मंगेश किंजळकर (५) ही बालिका आणि सुनिता गंगाराम निवळेकर (५५ रा. तुरळ, सुवरेवाडी) या दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुलोचना शांताराम किंजळकर (५५) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. भरणेनाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मारूती सुपर कॅरी जीप मागे घेताना चार वर्षाच्या चिमुरड्याचा चाकाखाली सापडून मृत्यू झाला आहे. अर्णव सचिन सुतार (भरणे, ता. खेड) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.संगमेश्वर येथे कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात साक्षी सहदेव पाताडे (४६, मालवण) ही महिला जखमी झाली तर लांजा येथे स्वीफ्ट गाडीला कंटेनरची धडक बसल्याने तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.