शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या ६५० शाळा बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:17 IST

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शाळा बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली ...

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामध्ये सप्टेंबर अखेर पटसंख्या निश्चितीनंतर या शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शाळा बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली चालू शैक्षणिक वर्षात शेकडो शाळा बंद करुन तेथील मुलांचे अन्य जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांमधील शिक्षकवर्गातही अस्वस्थता पसरली आहे.जिल्हा परिषदेच्या २ हजार ६२१ प्राथमिक शाळा असून, त्यामध्ये सुमारे ७ हजार ५०० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. या शाळांमध्ये ० ते १० पटसंख्येच्या सुमारे ६५० प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येतात. तसेच या शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरीही खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारा आहे़जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मार्च-एप्रिल महिन्यादरम्यान प्रत्येक तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तसेच स्थलांतरीत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो़ दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याने पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना सतत आटापिटा करावा लागतो़ पटसंख्या कमी झाल्यास शिक्षकांनाही अतिरिक्त ठरण्याची भीती सतत जाणवत असते़ त्यामुळे पटसंख्येअभावी शाळा बंद होऊ नये, यासाठी शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांची शोधमोहीम सतत सुरु असते़ ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या पाहूनच शिक्षकांची निश्चिती करण्यात येते़ त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये किती शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, हे आता लवकरच समजणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या ही शिक्षकांसाठी चिंतेचे बाब बनत चालली आहे. आरटीई कायद्यानुसार कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या ८८ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यंदाही पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करण्यात आल्याने मागील शैक्षणिक वर्षात १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असून, त्याला शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध सुरु आहे. शाळा बंद झाल्यास त्याचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे.