शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-रायगड जिल्हासीमेवरील वाद संपुष्टात, अडथळा अखेर दूर, बस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:21 IST

पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्दे गणेशोत्सवाच्या काळात ग्रामस्थांना दिलासा, वाद संपुष्टात आल्याने आनंदवादामुळे बस फेऱ्या ठेवल्या होत्या बंद

रत्नागिरी : पोलादपूर (जि. रायगड) येथील रस्ताविषयक अडथळे दूर करण्यासंदर्भात तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच कातळी ते पळचील रस्ता वाहतुकीतील अडथळा दूर करण्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाला यश आल्याने आता या मार्गावरून एस. टी. वाहतूक सुरळीत होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील या रस्त्यावरील वाद आता कायमचा संपुष्टात आला आहे.पोलादपूर तालुक्यातील कालवली मोहल्ला येथील रस्ता, पैठण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रालगतचा रस्ता वादातीत राहिला होता. या रस्त्यांबाबतच्या वादावर तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील कातळी पळचील या रस्त्यावरील वाद सुरू होता.कशेडी टॅब पोलीस चौकीच्या समोरील या रस्त्याच्या डाव्या बाजूची घरे रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असून, उजव्या बाजूच्या घरांचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे समोरासमोरील कुटुंबांना या वादाचा फटका बसत होता. या रस्त्यावरून पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर भागात जाणाऱ्या वाहनांना विशेषत: एस्. टी. महामंडळाच्या बसेसना रायगड हद्दीतील घराच्या काँक्रीटच्या कम्पाऊंड वॉलचा अडथळा होत होता. त्यामुळे अलिकडेच येथून पळचीलकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाल्या होत्या.याविषयी पोलादपूर तहसीलदार घोरपडे यांनी नायब तहसीलदार समीर देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीसपाटील आनंद निविलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या रस्त्यावरील वादग्रस्त अतिक्रमण असलेली कम्पाऊंड वॉल जेसीबीद्वारे भुईसपाट करून हा वाद कायमचा दूर केला. परिणामी, या रस्त्यावरून बंद झालेल्या बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRaigadरायगड