शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:35 IST

स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला.

ठळक मुद्दे७० वर्षात प्रथमच धनगर प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीतविनायक राऊत यांनी केले कौतुक

देवरूख :स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला.

देश स्वतंत्र होऊन ७० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजात अनेक कर्तृत्ववान कार्यकर्ते तयार झाले, त्यांनी समाज संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित समाज जडणघडणीची चळवळ कार्यरत ठेवली. मात्र, लोकशाही प्रक्रियेत आवश्यक असलेल्या लोकप्रतिनित्व करणाऱ्या पदावर काम करण्याची संधी कोणत्याही कार्यकर्त्याला मिळाली नव्हती. त्याहीपेक्षा राजकीय पक्षांनी ती दिली नाही.रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धनगरवाड्या आजही मूलभूत समस्यांपासून वंचित आहेत. राज्य शासनाकडून अपेक्षित असलेल्या रस्ता, पाणी सुविधाही मिळू शकल्या नाहीत. धनगर समाजाच्या समस्या जिल्हास्तरावर आक्रमकतेने मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने धनगर समाजातील कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जिल्हा नियोजन समितीसारख्या समितीवर घेणे क्रमप्राप्त ठरत होते. या सर्व बाबींचा विचार करुन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी तुकाराम येडगे यांना संधी दिली.जिल्ह्यातील धनगरवाड्यांच्या विकासासंदर्भात जिल्हा नियोजनमधून विशेष बाब निधीला मान्यता देऊन येडगे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्यानंतर २९ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री वायकर यांनी २०१९च्या आर्थिक वर्षाकरिता १६५ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता दिली.

या निधीमधून जिल्ह्यातील धनगरवाड्यांसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करण्यात येणार असून, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री वायकर यांनी या ठरावाला अधिकृत मान्यता दिली. धनगरवाड्यांसाठी विशेष बाब म्हणून निधी देण्याच्या सूचनांचे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी कौतुक केले. धनगरवाड्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक असल्याचे यावेळी खासदार राऊत म्हणाले.रत्नागिरीचे पालकमंत्री वायकर, शिवसेना सचिव तथा रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, जिल्ह्यातील आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक काम करत असून, नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार माझी सामाजिक चळवळ सुरु ठेवणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, जिल्हा नियोजन समितीच्या ठरावानुसार धनगरवाड्यांच्या विकासासाठी मान्यता दिलेल्या विशेष बाब निधीसाठी पाठपुरावा करणार आहे, असे ते म्हणाले. धनगर समाजातील विविध संघटना आणि समाजातील पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने आपला आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला.

आगामी काळात काम करत असताना शिवसेना शाखाप्रमुखांपासून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच पातळीवर विश्वासाने काम करणार असून, पालकमंत्री वायकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचे तुकाराम येडगे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी