शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायत निवडणूक रंगतदार, १२ रोजीच स्पष्ट होणार कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:47 IST

देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे निश्चित केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांना मिळणारी मते ही अन्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराची मते डोकेदुखीमतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे १२ रोजीच स्पष्ट होणार

सचिन मोहितेदेवरुख : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे निश्चित केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांना मिळणारी मते ही अन्य उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. प्रत्यक्षात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे १२ रोजीच स्पष्ट होणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी भाजप - मनसे - आरपीआय महायुतीकडून मृणाल शेट्ये उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादी - काँग्रेस - जनता दल - बहुजन विकास आघाडी - कुणबी सेना या महाआघाडीकडून विद्यमान नगरसेविका स्मिता लाड या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. शिवसेनेकडून धनश्री बोरूकर व स्वाभिमान पक्षाकडून विद्यमान नगरसेविका मिताली तळेकर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.या चारही उमेदवारांसह अपक्ष उमेदवार म्हणून अनघा कांगणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे कांगणे यांनी या निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. शहरात सर्वच पक्षांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवार कांगणे यांनीही आपला विकासात्मक जाहीरनामा शहरातील मतदारांसमोर मांडला आहे. कुणबी बांधवांनी अनघा कांगणे यांना उमेदवारी देत जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.देवरूख नगरपंचायत कार्यक्षेत्रात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे. या समाजानेच अनघा कांगणे यांना उमेदवारी दिल्यामुळे तसेच हा समाज एकसंघ राहिल्यास कांगणे या निर्णायक मते मिळवू शकतात. तर दुसरीकडे स्मिता लाड, मृणाल शेट्ये, धनश्री बोरूकर व मिताली तळेकर या उमेदवारांनीही विजयाचा दावा केला आहे.

प्रत्येक पक्षाने आपल्या मतांची ताकद यापूर्वीच्या निवडणुकांमधून आजमावलेली आहे. यात स्वाभिमान पक्षच पहिल्यांदा लढत आहे. यामुळे त्यांचे मतांचे बळ सद्यस्थितीत अस्पष्ट आहे. त्यातच अपक्ष उमेदवार अनघा कांगणे या किती मते घेतील, हे देखील सध्या गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, कांगणे जी मते पदरात पाडतील, ती मते ही अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या गोटातीलच असणार आहेत.अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांची नगराध्यक्षपद निवडणुकीतील उडी अन्य सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शहरातील कुणबी बांधवांनी त्यांना चांगली साथ दिल्यास या निवडणुकीत कांगणे चमत्कारही घडवू शकतात, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

आजवरच्या निवडणुकीत देवरुखात अपक्ष उमेदवार कधीच निवडून आलेले नाहीत. येथील मतदार हे अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान करतात, हे आजवर झालेल्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. कांगणे यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढविली होती व काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, याची जाणीव सर्वपक्षीय उमेदवारांना असणे गरजचे आहे.रंगत वाढलीदेवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना अर्ज बाद झाल्याचा फटका बसला होता. त्यामुळे अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, न्यायालयाने राजकीय पक्षांना दिलासा देत हे अर्ज बैध ठरवले होते. त्यामुळे निवडणुकीत पुन्हा एकदा रंगत आली आहे. अपक्ष उमेदवार कोणाची मते घेणार?मतदारांच्या गाठीभेटीप्रत्यक्षात मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, हे १२ रोजीच स्पष्ट होणार आहे. भाजप युती व काँग्रेस आघाडीकडून उमेदवारांचे छायाचित्र असलेले रथ मतदारांना आकृष्ठ करण्यासाठी संपूर्ण शहरात फिरत आहेत. यामुळे या दोन उमेदवारांमध्ये प्रचाराची वेगळीच रंगत पाहावयास मिळत आहे. शिवसेना व स्वाभिमान पक्षाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना घरोघर प्रचार करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक