शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक, २५ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 18:34 IST

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात २६२ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक२५ फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरी : मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच २६६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ५ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, उमेदवारांमध्ये अर्ज भरण्याबाबत अजूनही उदासीनता दिसून येत आहे.मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंच व सर्व सदस्यपदांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर, गुहागर तालुक्यातील असगोली, चिपळूण तालुक्यातील टेरव आणि संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या एकूण ४४४ जागांसाठीही २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यात सर्वात जास्त ग्रामपंचायती संगमेश्वर तालुक्यात (५४) असून, सर्वात कमी ग्रामपंचायती रत्नागिरी तालुक्यात (१२) आहेत.जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी ५ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, अर्ज भरण्याबाबत अजूनही उमेदवारांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसून येत नाही.चार ठिकाणी सार्वत्रिक निवडणूकमंडणगड : वाल्मिकीनगरगुहागर : असगोलीचिपळूण : टेरवसंगमेश्वर : तळेकांटे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक