मेहरून नाकाडे -
रत्नागिरी : गोरगरिबांचा ‘बदाम’ म्हणून ओळख असलेला शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. सद्य:स्थितीत गुजरातमधील भरुच या शेंगदाण्याला मोठी मागणी आहे; पण त्याला टक्कर देईल असे नवीन वाण डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने विकसित केले आहे. या नव्या वाणाचे संशोधन पूर्ण झाले असून, उत्पादकतेची चाचणी स्थानिक शेतांमध्ये घेण्यात येत आहे.
संशोधन पूर्ण झाले असून, आता उत्पादकता मोजण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग सुरू आहेत. नवीन वाण तेलाऐवजी खाण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. - डाॅ. विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव (जि. रत्नागिरी)
भाजलेला, उकडलेला वा कच्चा, कोणत्याही पद्धतीने शेंगदाणा खायला आवडतो. मात्र, ज्या दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण४५% पेक्षा अधिक असेल ते खायला कडवट लागतात. तेलाचे प्रमाण कमी असलेला दाणा गोडसर व चविष्ट असतो.
शेतात उत्पादकतेची चाचणी सुरूटपोरा, चवीला गोड, कुरकुरीत शेंगदाणा खायला सर्वांनाच आवडतो. गुजरात येथील ‘भरुच’ हा शेंगदाणा तसा असल्याने खाण्यासाठी सर्रास वापरला जातो.तेलासाठी भात संशोधन केंद्राने ‘कोकण टपोरा’ व ‘कोकण भूरत्न’ हे दोन वाण आधीच उपलब्ध करून दिले आहेत.मात्र, खास खाण्यासाठीच्या शेंगदाण्याचे संशोधन केले आहे. हे वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे आहे. यात तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के असेल. सध्या शेतात उत्पादकतेची चाचणी सुरू आहे.