शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:29 IST

भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

ठळक मुद्दे विसर्जनानंतर काही तासातच झाला किनारा स्वच्छभाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित

रत्नागिरी : भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संकलन करण्यात आले. गौरी - गणपती विसर्जन असल्यामुळे भाविकांनी टाकलेले तीन टन निर्माल्य संकलित करण्यात आले.पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे दरवर्षी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येतो. गौरी गणपती विसर्जनाबरोबर पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्त्या, कापूर पाण्यात टाकण्यात येतात. हे निर्माल्य लाटेबरोबर किनाºयावर येते. त्यामुळे ते पायाखाली येण्याची शक्यता असते. त्याऐवजी सर्व निर्माल्य संकलन करून ते भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहे.

मांडवी येथून दोन ट्रक, तर भाट्ये येथून एक ट्रक निर्माल्य संकलित करण्यात आले. गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतींची संख्या अधिक असते. अनंत चतुर्दशीच्या दिवशीही गणपती विसर्जन केले जात असल्यामुळे या दिवशी निर्माल्य संकलन केले जाणार असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी दिली.

संस्थेतर्फे गेली १२ वर्षे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. गोळा केलेले निर्माल्य प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे पाठविण्यात येते. या केंद्रात निर्माल्यापासून खत तयार करण्यात येते. तयार केलेले खत रोपवाटिकेसाठी वापरण्यात येते.निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. नगराध्यक्ष राहुल पंडित, तसेच नगरपालिकेचे कर्मचारी संकलन कार्यक्रमात सहभागी झाले होते. किनाऱ्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पिंपही ठेवण्यात आली होती. पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेसोबत अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिरगाव मत्स्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये जागृती होत असल्याने, बहुतांश नागरिक स्वत:हून निर्माल्य कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करत होते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी