शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी आली तरी रेशन धान्य दुकानात खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 18:06 IST

पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे.

ठळक मुद्देआंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य राहिले पडून गोदामकीपर संपात सहभागी असल्याने धान्य वाहतूकही ठप्पफटका ग्रामीण जनतेला, दिवाळीपूर्वी धान्य मिळण्याबाबत चिंतागावातील जनतेची धान्यासाठी दुकानात हेलपाटे

रत्नागिरी , दि. १२ : पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीपूर्वी धान्य मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे.

पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, हे निर्णय शासनाने रद्द करावेत, या मागणीसाठी पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ सप्टेंबरपासून पुरवठा विभागाचे काम पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे रेशनकार्डचे वितरण, नावे कमी करणे - चढविणे आदी कामांबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये अजून धान्यच आलेले नाही.

३ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनी पुरवठा विभागाचे काम बंद केले आहे. गोदामात दोन महिन्यांचा धान्यसाठा असला तरी प्रत्येक तालुक्यात धान्याची मागणी करण्यासाठी आवश्यक असणारे चलन अद्याप दुकानदारांनी भरलेले नाही. त्यामुळे त्यांना धान्याची उचल गोदामातून करता येत नाही. गोदामकीपर संपात सहभागी असल्याने विभागाकडून धान्याची वाहतूकही ठप्प झाली आहे.

याचा फटका ग्रामीण जनतेला अधिक बसला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, अजूनही रेशन दुकानात खडखडाट असल्याने दिवाळी धान्याविना कोरडीच जाणार की काय, अशी चिंता सतावत आहे.

पुरवठा विभागाचे काम बंद होऊन रेशनदुकानदारांना दरदिवशी संप मिटवण्याची प्रतीक्षा करावी लागत आता ९ दिवस झाले. अजूनही संप मिटण्याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. रेशनदुकानदारांना चलन भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.

गोदामात धान्य असले तरी जिल्ह्यातील ९१५ रेशनदुकानात धान्याचा खडखडाट आहे. ग्रामीण भागातील जनता दरदिवशी दुकानात येऊन धान्य कधी येणार, अशी आतुरतेने विचारणा करीत आहेत. दिवाळीपूर्वी तरी हा संप मिटेल, अशी आशा जनतेला वाटत आहे.गोदामात धान्य असले तरी सध्या रेशनदुकानात धान्याचा कण नसल्याने ही दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. चलन भरून मागणी नोंदविण्यासाठी दुकानदारांना तहसील कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. गावातील जनता धान्यासाठी दुकानात हेलपाटे मारत आहेत.- प्रशांत पाटील,रेशनदुकानदार, कोळंबे, ता. रत्नागिरी

टॅग्स :diwaliदिवाळीfoodअन्न