शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

राजन साळवी यांना जनतेचा एकमुखी कौल

By admin | Updated: October 19, 2014 22:59 IST

र्व सात उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही अधिक आहेत

विनोद पवार - राजापूर --राज्यात तुटलेली युती व फुटलेली आघाडी यामुळे राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदार संघात कमी झालेले मतदान पाहता कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, आज मतमोजणीच्या वेळी या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने एकमुखी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून साळवी यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली होती. १ लाख ४३ हजार ७७ इतके मतदान झाले होते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ७६ हजार २६६ मते शिवसेनेचे राजन साळवी यांनी मिळवत आपले प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजन देसाई यांच्यावर ३९ हजार १३९ मतांची आघाडी मिळवत विजय संपादन केला आहे. येथील मतदारांनी एकतर्फी राजन साळवी यांच्या पारड्यात मते टाकल्यामुळे काँग्रेसवगळता अन्य सर्वच उमेदवारांची अनामतही जप्त होणार आहे.मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रथम टपाली मतदानाची मोजणी हाती घेण्यात आली होती. अगदी तेव्हापासून राजन साळवी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ती शेवटपर्यंत कायम राहिली. प्रचारात कोणत्याही प्रकारचा गवागवा न करता, किंंवा एकही जाहीर सभा न घेता पहिल्यापासूनच शिवसेनेची छुपी प्रचार पध्दती राबवली होती. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार करता यावेळी राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मताधिक्य चांगलेच वाढलेले दिसून येते. काँग्रेसने राजन देसार्इंसारखा स्वच्छ चेहरा उमेदवार म्हणून दिलेला असतानादेखील त्याचा फायदा काँग्रेसला उठवता आलेला नाही. विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची चांगलीच पिछाडी झाल्याचे पाहावयास मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या वेळची पडलेली ५५ हजार मतेही या निवडणुकीमध्ये काँग्रेसला टिकवता आलेली नाहीत. उलट यामध्ये पिछाडीवर येत राजन देसाई यांना ३७ हजार २०७ मते मिळाली आहेत.या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांनी मिळवलेली मते ही इतर सर्व सात उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षाही अधिक आहेत. चौरंगी लढत होईल, असे मानले जात असतानाच प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी दुरंगी लढत दिसून आली. काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात स्वतंत्रपणे उतरल्यामुळे राष्ट्रवादी किती मते घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. यामुळे काँग्रेसला तोटा सहन करावा लागेल, असे मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार अजित यशवंतराव यांना ११ हजार ९२३ मते मिळाली, तर संघ परिवार, ब्राह्मणवर्ग, गुजराती व बौध्द मतांच्या जोरावर आपले नशीब आजमावणाऱ्या भाजपाच्या संजय यादवराव यांनी ९ हजार ९५३ मते मिळवली. फक्त भाजपाच्या पारड्यात एकच गोष्ट दिलासादायक ठरली ती म्हणजे मतदारसंघातील सर्वच ३३२ बुथवर भाजपाने शुन्याचा भोपळा फोडण्यात यश मिळवले. यापलिकडे भाजपचे कोणतेही कर्तृत्व या मतदारसंघातून दिसून आले नाही. आजपर्यंत एकदाही या मतदार संघात निवडणूक न लढवलेल्या भाजपाने आपले अस्तित्व दाखवले, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.शिवसेनेचे राजन साळवी यांनी मिळवलेल्या आघाडीला त्यांनी गेल्या ८ ते १० वर्षांत मतदार संघात राहून घराघरात निर्माण केलेली आत्मियताच कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. तसेच गेल्या अनेक वर्षात राजन साळवी यांनी आरोग्याच्या बाबतीत आपली स्वत:ची निर्माण केलेली यंत्रणा सर्वांत प्रभावी ठरली आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदारांवर जास्त राहिला आहे. कोणत्याही ठिकाणचा पेशंट सिव्हील हॉस्पिटलला गेल्यनंतर त्याला त्याठिकाणी त्यांच्या माणसांनी केलेली मदत राजन साळवींच्या पाठीशी दुवा बनून राहिल्याचे या निवडणुकीत दिसून आले. साळवी यांचा विजय त्यामुळेच सुकर झाल्याचे सध्या राजकीय वर्तुळातून म्हटले जात आहे.या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील मतदारांनी नोटाचा वापर केल्याचे दिसून आले. मतदारसंघातील १९३५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्याने नोटा पाचव्या स्थानी दिसून आला. हिंंदू महासभेच्या प्रमिला भारती यांना १८२५, बहुजन मुक्ती मोर्चाचे रमेश पाजवे यांना ८९५, तर अपक्ष गणपत जाधव यांना ७५३ मते मिळाली. त्यामुळे हे उमेदवार नोटापेक्षाही मगे राहिल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना समाधानकारक विकासकामे न करतादेखील शिवसेनेच्या राजन साळवी यांनी निव्वळ वैयक्तिक पातळीवर निर्माण केलेले संबंधच त्यांच्या मदतीला आल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. केवळ आपल्या सुखदुखात सहभागी होणारा आमदारच आपल्याला हवा असल्याचे मतदारांनी या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. मतदारसंघासाठी कोणताही वेगळा विकासाचा मुद्दा समोर न ठेवतादेखील हा गड शिवसेनेने अबाधित राखण्यात यश मिळवले आहे.