राजापूर तालुक्यातील काेविड लसीकरणाचा आमदार राजन साळवी यांनी आढावा घेतला. यावेळी तसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, पाेलीस निरीक्षक जनार्दन परब उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : सध्या कोविड १९ आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता येणाऱ्या काळातील उपाय योजनांसाठी आमदार राजन साळवी यांनी तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तालुक्यातील लसीकरणाचाही आढावा घेतला.
तालुक्यातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता रायपाटण येथे उभारण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येणाऱ्या काळातील कोविड प्रादुर्भावाबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी तालुक्यातील आराेग्य विभागाच्या कामकाजाचीही माहिती घेतली. या आढावा बैठकीला तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परब, नाटे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आबासो पाटील, तालुका आरोग्य विभाग प्रतिनिधी मोहन जाधव उपस्थित होते.