शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राजन साळवींचा विक्रमी मताधिक्याने विजय

By admin | Updated: October 20, 2014 00:59 IST

शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी ३९,०६२ एवढ्या मताधिक्याने एकतर्फी विजयश्री खेचून आणली.

लांजा : राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होऊन कुणालाही मोठे मताधिक्य मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच सर्वांचे अंदाज चुकवून मताधिक्य मिळवत शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी ३९,०६२ एवढ्या मताधिक्याने एकतर्फी विजयश्री खेचून आणली. राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमधून दाखवून दिले आहे. मात्र, युतीमध्ये फुट व आघाडीमध्ये बिघाडी झाल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष स्वबळावर लढणार असल्याने मतदानाचे विभाजन होऊन कुणालाही मोठे मताधिक्य मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र ऊर्फ राजन देसाई यांच्यात जोरदार लढत होणार असल्याने अनेक राजकीय ज्येष्ठ मंडळींकडून भाकीत केले जात होते. भाजपचे उमेदवार संजय यादव व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित यशवंतराव हे २५ ते ३० हजार इतकी मते मिळवतील, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला.रविवारी सकाळी ८ वाजता कडेकोट बंदोबस्तात लांजा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी ३२५२ इतके मताधिक्य मिळवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे उमेदवार ९ हजारांची मते मिळवू शकले नाहीत. तसेच काँग्रेसचे राजन देसाई यांना ११८२ मते मिळवण्यात यश आले. आमदार राजन साळवी यांनी प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य घेत ४३ हजार १०१ मते मळवत २५ हजार ३०२ मताधिक्य मिळवले. यावेळी काँग्रेसचे राजन देसाई यांना १७ हजार ७१६ मते मिळाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित यशवंतराव यांना ७ हजार ८०७ मते मिळाली. साळवी हे प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य मिळवत गेले. ते अखेरच्या २४व्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य वाढत गेले. लांजा-राजापूर साखरपा विधानसभा मतदारंघामध्ये एकूण २ लाख ३४ हजार ६९ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५६६ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला होता. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना एकूण ७६ हजार २६६ मते मिळाली. (प्रतिनिधी)