रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड, राजापूर, संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांना शुक्रवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. याचा लांजा, राजापूर तालुक्यांना जोरदार तडाखा बसला. पावसामुळे विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग शुक्रवारी रात्रभर अंधारात होता. काही ठिकाणी मध्यरात्री, तर काही ठिकाणी पहाटे वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. रत्नागिरी शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. रत्नागिरीत शुक्रवारी सायंकाळी जोरदार वारे वाहात होते. रात्रीपर्यंत वाऱ्याचा वेग वाढल्याने पाऊस येणार, हे निश्चित होते.मध्यरात्री पावसाला सुरूवात झाली. वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या या पावसामुळे हवेत गारवा आला. (प्रतिनिधी)
पाच तालुक्यांना पावसाळी वादळाचा दणका
By admin | Updated: October 19, 2014 00:30 IST