शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-चिपळुणात मोबाईल दुकानांवर छापे

By admin | Updated: June 21, 2017 01:09 IST

साडेपाच लाख रुपयांचे बनावट अ‍ॅक्सेसरीज जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी / चिपळूण : बनावट अ‍ॅक्सेसरीज विक्री करणाऱ्या रत्नागिरीतील तीन आणि चिपळुणातील दोन मोबाईल दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला. या दोन्ही छाप्यात पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे बनावट अ‍ॅक्सेसरीज जप्त केले आहेत. याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानांमधून बनावट वस्तू विक्री केल्या जात असल्याची बाब या धाडींमुळे उघड झाली आहे. रत्नागिरीतील खेतेश्वर, महालक्ष्मी व नागणेशी मोबाईल शॉपी या दुकानांवर पोलिसांनी छापा मारून लाखो रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. निखिल दिनकर पाटील (२६, रा. शाहू मिल कॉलनी, कोल्हापूर) हे इन्टेक्स कंपनीचे तपासणी अधिकारी आहेत. रत्नागिरी शहरात आठवडा बाजार परिसरात असलेल्या खेतेश्वर, नागणेशी व महालक्ष्मी या मोबाईल दुकानांमध्ये मोबाईलच्या बॅटऱ्या व इतर बनावट अ‍ॅक्सेसरीज विक्री होत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे निखिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांची भेट घेऊन माहिती दिली. विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंग पाटील यांच्या एका पथकाने आठवडा बाजार परिसरात जाऊन प्रथम खेतेश्वर दुकानावर छापा मारला. त्यानंतर बाजूला असलेल्या महालक्ष्मी व नागणेशी या मोबाईल दुकानांवर छापा मारला. याठिकाणी पोलिसांनी सुमारे पावणे दोन लाखांचा बनावट ऐवज जप्त केला आहे. कॉपीराईटप्रकरणी पोलिसांनी बगताराम मल्लाजी पुरोहीत (रा. मुंबई), हरसनराम नाथुजी पुरोहीत (रा. तेली आळी) व महेंद्रसिंग पर्वतसिंग राठोड या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिपळूणमध्येही याच पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. चिपळुणात दोन मोबाईल शॉपींच्या मालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडून साडेतीन लाखांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनोजकुमार देवरामजी परमार व छगनराम मेघाजी चौधरी (दोघे रा. चिपळूण) अशी त्यांची नावे आहेत. निखिल पाटील यांनीच तेथेही गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी येथील पोलिसांच्या मदतीने शनिवारी सायंकाळी ४ वाजता या दोन्ही मोबाईल शॉपीवर छापा टाकला. यावेळी तेथे असलेल्या साहित्यावर इंटेक्स कंपनीचे ओरिजनल होलोग्राम व बारकोड दिसून आला नाही. त्यामुळे या दोन्ही दुकानांमधून ३ लाख ४४ हजार ५५० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये २६९ बॅटऱ्या, २२९ क्लिप कव्हर, ८१ बॅक कव्हर जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव करीत आहेत.