शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण बाजारपेठेत राडा -चार तरुणांची व्यापाऱ्याला रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 20:26 IST

शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी बेदम मारुन गाडीची केली तोडफोड

चिपळूण : शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यानंतर व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्या चौघांनी बेदम धुलाई करुन गाडीची तोडफोड केली. यामध्ये तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १२ वाजता घडली. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीेचे कारण समजू शकलेले नाही. 

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार अमित अनंत शिर्के, राकेश चव्हाण, प्रविण वासुदेव घुळे, किरण चव्हाण हे चौघेजण पांढऱ्या रंगाच्या अलिशान चारचाकी गाडीतून (क्र. एम एच ११ ए डब्ल्यु ८२१८) बाजारपेठेत आले. स्वामी कॉम्प्लेक्सच्या बाहेर फळविक्रीचा व्यवसाय करणारे नयन पिसे यांना त्यांनी दुकानातून बाहेर बोलवून घेतले. नयन रस्त्यावर आल्यानंतर त्याला चौघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वडिल शिवाजी पिसे सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्यांनाही मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या दुकानाचीही नासधूस केली. हा प्रकार समजल्यानंतर शहरातील व्यापारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी चौघांची धुलाई केली. त्यांच्याकडे मारामारीसाठी वापरणारे प्लास्टिक रॉड सापडले. जमलेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून गाडीची नासधूस केली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ सहकाºयांना घेवून घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर जमाव बाजूला झाला. जखमी अनंत शिर्के, राकेश चव्हाण व वासुदेव घुळे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. किरण चव्हाण तेथून पसार झाला. पोलिसांनी मारामारीसाठी वापरलेले रॉड व गाडी जप्त केल्यानंतर दोन्ही बाजूचे लोक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarketबाजार