शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

रवींद्र माने स्वगृही परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:53 IST

पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

ठळक मुद्देपक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी कोकणचे नेते नारायण राणे यांना धक्का देण्याचे राजकारणउद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत हुकलेला मुहूर्त आज साधला गेला

रत्नागिरी,9  : पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

१९९0 साली संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने प्रथम आमदार झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळी देवरूखला जंगी सभा झाली होती. त्यानंतर १९९५ साली ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री म्हणून रवींद्र माने यांची निवड झाली.

रत्नागिरीचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले. जोवर मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर होते, तोपर्यंत माने पालकमंत्री होते. व्यासप्रकरणी मनोहर जोशी यांच्याबरोबरच माने यांनाही पद सोडावे लागले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष बने यांनी बंडखोरी केलेली असतानाही रवींद्र माने तिसºयांदा विजयी झाले.

२00४ मध्ये मात्र संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने यांच्याजागी सुभाष बने यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून माने नाराज होते. २0१0 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादीत गेल्यानंतर माने यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. गेले वर्षभर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते एकदा मातोश्रीवर जाऊन पोहोचलेही होते. मात्र त्यावेळी प्रवेश झाला नाही. त्यावेळी हुकलेला मुहूर्त आज साधला गेला. दुपारी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.शिवसेनेचा हेतू काय?पक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना परत पक्षात घेण्यामागे शिवसेनेचा काय हेतू आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेला धक्का देण्याचा मुद्दा उघडपणे मांडला आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्ष मजबूत करण्यासाठी जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.