शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गेट वे आॅफ दाभोळ पुस्तकाचे प्रकाशन

By admin | Updated: May 25, 2016 23:40 IST

विविध ट्रस्टनी केलेल्या मदतीमुळे प्रकाशनाच्या दिवशी हा अमूल्य संदर्भमूल्य असलेला ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला गेल्याने या पुस्तकाची पहिली आवृत्ती जवळपास कार्यक्रमस्थळीच संपली.

खेड : नामवंत इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी असंख्य पुरावे उपलब्ध करून नव्याने लेखनबद्ध केलेल्या कदीम बाबूल हिंद (हिंदचा प्राचीन दरवाजा) अर्थात गेट वे आॅफ दाभोळ या ऐतिहासिक दस्तऐवज ठरू पाहणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन एम. आय. बी. गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, खेड येथे बज्म - ए - इमदादिया संस्थेच्यावतीने कतार येथील जागतिक कीर्तीचे उद्योजक, शिक्षणप्रेमी हसनभाई चौगुले यांच्या हस्ते झाले.यावेळी प्राचार्या शांता सहस्त्रबुद्धे, प्रा. मुनीर अहमद अल्लाबक्ष, डॉ. अमीन दळवी, डॉ. उस्मान पन्छी, सचिव कमाल मांडलेकर, धीरज वाटेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठण आणि स्वागतगीताने झाली. बज्म - ए - इम्दादिया संस्थेचे चेअरमन ए. आर. डी. खतीब यांनी प्रास्ताविक केले. फारसे शिक्षण नसताना अण्णा यांनी केलेले पुराव्यासहचे हे लेखन पीएच. डी.च्या अभ्यासकाला मार्गदर्शक ठरेल, असे प्रा. सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.डॉ. दाऊद दळवी यांच्या संदेशाचे वाचन प्रा. सदाशिव टेटविलकर यांनी केले. आपली संपूर्ण सकारात्मक ऊर्जा वापरुन आपण कोणतेही काम सहज यशस्वी करू शकतो, असे उद्योगपती हसन चौगुले यांनी सांगून अण्णांच्या कार्याचे कौतुक केले. या पुस्तकाच्या दाभोळ गावात आपण आगामी काळात शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पुस्तकाच्या तब्बल २०० प्रती त्यांनी आपल्या परिचयातील अभ्यासूना भेट देण्यासाठी त्यांनी विकत घेतल्या. विविध ट्रस्टनी केलेल्या मदतीमुळे प्रकाशनाच्या दिवशी हा अमूल्य संदर्भमूल्य असलेला ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला गेल्याने या पुस्तकाची पहिली आवृत्ती जवळपास कार्यक्रमस्थळीच संपली. पुस्तकातील छायाचित्रांकरिता विलास महाडिक, डी. टी. पी. मुखत्यार मुल्लाजी यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाबुद्दिन परकार यांनी केले. (प्रतिनिधी)कदीम बाबूल हिद अर्थात गेट वे आॅफ दाभोळ हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरू पाहणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक हसनभाई चौगुले यांच्याहस्ते झाले.