शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोजन प्लांटचे काम बंद ठेवण्याचे आश्वासन

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

ग्रामस्थांची माहिती : लोटे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

आवाशी : विनती कंपनीच्या कोजन प्लांटच्या विरोधात लोटे ग्रामस्थांच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे लेखी आश्वासन कंपनीच्यावतीने देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती आॅर्गेनिक (इं.) लि. ही कंपनी दगडी कोळशापासून वीजनिर्मिती करणाऱ्या युनिटचे काम सुरु करत आहे. काही दिवसांपूर्वी या कामाचे खोदाईकाम सुरु झाल्याचे वृत्त कळताच पुढील धोका लक्षात घेत काही जागरुक नागरिकांनी कंपनीला हे काम थांबवा, अशी विनवणी केली. मात्र, त्यांना न जुमानता कंपनीने काम सुरुच ठेवले. या कामाच्या सर्व परवानग्या घेतलेल्या नसतानाही ग्रामस्थांच्या विनंतीचा अवमान करत कंपनीने काम सुरुच ठेवले. याचा निषेध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला लोटे ग्रामस्थांनी या कंपनीसमोर धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनांतन खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे, प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, कंपनी व्यवस्थापन यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देत हे आंदोलन थांबवले. त्यानुसार ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूणचे प्रभारी उपविभागीय अधिकारी मोरे, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे काकडे, मनसेचे वैभव खेडेकर, नाना चाळके, माजी सरपंच चंद्रकांत चाळके, सुरेंद्र चाळके, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव आंब्रे, संजय चाळके, सुरेश चाळके, संतोष आंब्रे, कंपनीचे संचालक महादेव महिमान, वरिष्ठ व्यवस्थापक जांभेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन खरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)अहवालाची प्रतीक्षा : मंडळाकडून पत्रप्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस यांच्या मध्यस्थीने व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करुन पाच मेगावॅट क्षमतेचा उभारल्या जाणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम थांबवत आहोत. अहवाल येईपर्यंत हे काम बंद राहणार आहे. - राजीव जांभेकर, एजीएम, विनती आॅर्गेनिकविनती कंपनीला दि. २३ रोजी पत्र देण्यात आले आहे. यामध्ये ८.७२ इतक्या मेगावॅट निर्मितीला स्थगिती देण्यात आली आहे. पाच मेगावॅट निर्मितीचे काम धोकादायक वाटत असल्याने बंद करत असल्याचे पत्र दिले आहे.- एस. बी. मोरेप्रदूषण नियंत्रण मंडळ.