चिपळूण : शिक्षण हा माणसाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग झाला आहे. शिक्षण विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान, अमेरिका व चीनने चांगली गुंतवणूक केली आहे. तेथे लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यापीठे उभारलेली आहेत. आपल्या देशात १२० कोटी लोकसंख्या आहे. येथे किमान ६० हजार विद्यापीठाची गरज आहे. परंतु, जेमतेम १ हजार विद्यापीठे आहेत. खासगी संस्थांनी आता स्वत:च विद्यापीठ होण्याची गरज असल्याचे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते-दहिवली येथील ‘शरदचंद्रजी पवार कृषी, उद्यानविद्या, अन्नतंत्रज्ञान व कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया’च्या मुख्य इमारतीचे उद्घाटन आज बुधवारी उपमुख्यमंत्र्यांहस्ते झाले. यावेळी जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव, रवींद्र माने, बापू खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा जाधव, सभापती दीप्ती माटे, उपसभापती संतोष चव्हाण, संजय कदम, अजय बिरवटकर, माधवी खताते, रसिका म्हादे, राजाभाऊ लिमये, केशवराव भोसले, अजित यशवंतराव, जयवंत जालगांवकर, जयंद्रथ खताते, संजय रेडीज, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, नाना मयेकर, गजानन पाटील, खरवते सरपंच हरिश्चंद्र घाग, दहिवली बुद्रुक सरपंच अनंत घाग, दहिवली खुर्द सरपंच सुरेश कदम, माजी सभापती सुरेश खापले, बारक्या बने, नंदू पवार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, गोविंदराव निकम यांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणाची गंगा कोकणात आली. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कृषीपूरक शिक्षणाची दालने कोकणवासियांसाठी खुली झाली. केवळ राजकारण करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासून काम करण्याची शिकवण कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली. कृषी पर्यटनाकडे पर्यटक वळवता येऊ शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. क्रीडा व कृषी संस्थेचा चांगला मिलाफ स'ाद्री शिक्षण संस्थेने केला आहे. कीटकनाशकाच्या अतिप्रमाणामुळे युरोपीय देशात आंबा व काही भाज्यांची निर्यात बंद आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स'ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव अशोक विचारे, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. निकम यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सलीम मोडक यांनी केले. (प्रतिनिधी)
खासगी संस्थांनी आता विद्यापीठ व्हावे : अजित पवार
By admin | Updated: May 15, 2014 00:31 IST