अडरे : चिपळूण शहरातील वालोपे वाशिष्ठी किनारी आज (रविवारी) सकाळी ९.४५ वाजता अवैध गावठी दारु हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाशिष्ठी नदीकिनारी गावठी हातभट्टीची दारु गाळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची खबर सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांनी दिली. मात्र, पोलीस येत असल्याची चाहूल संबंधितांना मिळताच . एका शेडखाली गावठी दारु गाळत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. यावेळी पोलिसांनी लोखंडी बॉयलर, नवसागर मिश्रित रसायने, प्लास्टिकचे कॅन असा १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी प्रमोद सुर्वे, मोहन सुर्वे, रवी मयेकर, यशवंत मयेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, अमोल यादव, राजू आरवट, गोपीनाथ शिगवण, चालक राजेंद्र देसाई यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)
वाशिष्ठी किनारी हातभट्टीवर छापा
By admin | Updated: August 3, 2014 22:46 IST