शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच एकाच दिवसात ४ कोरोनाबाधितांचा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तसेच एकाच दिवसात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोराेनाची दहशत वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गणपतीपुळे : सागरी महामार्गावरील आरेवारेमार्गे गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनसुध्दा रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सागरी सुरक्षा प्रभावी होणार

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व वेगाने मार्गक्रमण करू शकणाऱ्या बोटी आणल्या असून तटरक्षक दलाच्या ताफ्यात त्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी बोटी आणण्यात आल्या आहेत. दापोली ते मांडवा सागरी सुरक्षा प्रभावी होणार आहे.

साथींचे आजार वाढले

चिपळूण : उष्मा वाढला असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्दी, पडसे, तापसरी, डोकेदुखी, उलटी, जुलाबाने लोक त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात जाणे टाळत असून, घरीच औषधोपचार करीत आहेत.

पर्यटनासाठी नवे धोरण

लांजा : पर्यटनाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोकणातील पर्यटनासाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच पर्यटनासंदर्भात कोकणासाठी खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे.

टँकरने पाण्याची विक्री तेजीत

रत्नागिरी : नगर परिषदेतर्फे शहरामध्ये सोमवार दि. ५ व मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचे घोषित केले होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरील पंपिंग यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला होता. त्यामुळे अनेक अपार्टमेंटधारकांनी टँकरने पाणी विकत मागविले.

माती परीक्षण थेट शिवारात

रत्नागिरी : मृदा पत्रिकेद्वारे मातीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे पीक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वत: शेतकरीच आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून त्याप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षित होणार आहेत.

नादुरुस्त रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी-मुचरी ते वाशी सहाणेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण ४ या हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.