शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

By अरुण आडिवरेकर | Updated: January 25, 2025 19:04 IST

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती द्राैपदी ...

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी शनिवारी याची घाेषणा केली असून, प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.संजय दराडे यांनी कोकण विभागाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्थानकाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या हाेत्या. विशेषतः महिलांवरील अत्याचार महिलांबाबत असलेल्या तक्रारी याबाबत २४ तासाच्या आत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अनेक काही हत्या प्रकरण घडली आहेत. या प्रकरणांचा छडा लावण्यात संजय दराडे यांनी मोठी भूमिका बजावली आहे.नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या बंदुकीसारखा अवैधरित्या शस्त्रसाठा जप्त करून तब्बल ४४ बंदूक व ४ हजार काडतुसे पकडून आठ जणांची आंतरराज्य टोळी जेरबंद केली होती. त्यांनी धाराशिव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे अधीक्षक म्हणून काम केले आहे.कोकण परिक्षेत्रात जिल्हा पोलिस स्थानकात अद्यावत सोशल लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच सोशल सायबर क्राईममध्ये सोशल लॅब अॅक्टिव्ह होणार आहे.२००५ साली भारतीय पोलिस सेवेतील ते आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे नाशिक येथील असून, पुणे येथील इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही काळ ते लाेटे (ता. खेड) येथील घरडा केमिकल कंपनीत कार्यरतही हाेते.२०१५ मध्ये नाशिक कुंभमेळा बंदोबस्त यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कौतुक पत्र दिले हाेते. त्यांनी पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम केले हाेते. २०२४ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील कोकण परिक्षेत्रात यशस्वीपणे हाताळली. त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPoliceपोलिस