शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रथमेश दळवी, गोपीनाथ नाचरे यांची बाजी

By admin | Updated: December 26, 2015 00:08 IST

मंडणगड पंचायत समिती : तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग

मंडणगड : लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, रत्नागिरी व पंचायत समिती, मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेतील वरिष्ठ गटात प्रथमेश दळवी आणि कनिष्ठ गटात गोपीनाथ नाचरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर उपस्थित होते. कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांत ‘स्वच्छता व पाणी व्यवस्थापन’ या विषयांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील वरिष्ठ विभागातून प्रथमेश दळवी, आकाश सावरकर (दोघे लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय, मंडणगड), अनिकेत नाचणेकर(व्ही़ बी़ डी़ बी़ ए़ महाविद्यालय, आंबडवे) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ त्याचबरोबर कनिष्ठ विभागातून गोपीनाथ नाचरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड), देवयानी भोईटे (लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय, मंडणगड), उमेश मंद्रे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ स्पर्धेत परीक्षक म्हणून दिलीप मराठे, शांताराम पवार व हनुमंत सुतार यांनी काम पाहिले़ स्पर्धेत वरिष्ठ विभागाचे समन्वयक म्हणून डॉ. अशोक साळुंखे तर कनिष्ठ विभागाचे समन्वयक म्हणून प्रा़ महादेव वाघ यांनी काम पाहिले़ दोन्ही विभागातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले़ प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी सांगितले की, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या संतांनी समाजाला स्वच्छतेचे महत्व सांगितले़ पण आज त्यांच्या कार्याचे महत्व पुन्हा एकदा पटवून देण्याची आवश्यकता आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेड्यापाड्यात विशेषत: तरुणांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे़ कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण जाधव, विस्तार अधिकारी जयसिंग कांबळे, गट समन्वयक जितेंद्र साळवी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी धोंडीराम बंडे, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता घाडगे यांनी केले तर आभार अशोक साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडणगड महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांसह पंचायत समितीचे जितेंद्र साळवी व धोंडीराम बंडे यांनी मेहनत घेतली.़ (प्रतिनिधी)