ग्रामसंवाद रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रमेय आर्यमाने यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:31 AM2021-05-10T04:31:08+5:302021-05-10T04:31:08+5:30

आबलोली : ग्रामसंवाद सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामपंचायत सदस्य प्रमेय प्रदीप आर्यमाने ...

Prameya Aryamane elected as Ratnagiri District President | ग्रामसंवाद रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रमेय आर्यमाने यांची निवड

ग्रामसंवाद रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रमेय आर्यमाने यांची निवड

Next

आबलोली : ग्रामसंवाद सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी गुहागर तालुक्यातील आबलोली येथील ग्रामपंचायत सदस्य प्रमेय प्रदीप आर्यमाने यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसंवाद सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अजिनाथ बाबुराव धामणे यांनी प्रमेय आर्यमाने यांना निवडीचे पत्र दिले.

ग्रामसंवाद सरपंच संघ, महाराष्ट्र राज्य ही संघटना राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. संघटनेमार्फत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना प्रयत्नशील असते.

आर्यमाने यांनी आबलोली ग्रामपंचायतीत गेली १० वर्षे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनेच्या माध्यमातून रचनात्मक काम करुन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आर्यमाने यांनी सांगितले.

Web Title: Prameya Aryamane elected as Ratnagiri District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.