चिपळूण : खेड तालुक्यातील घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश भेकरे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामसभेचे अध्यक्ष व सरपंच अंकुश काते यांनी अध्यक्षपदासाठी भेकरे यांचे नाव सुचविले. ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव शंभर टक्के तंटामुक्त करण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश भेकरे यांनी निवडीनंतर व्यक्त केला.
प्रकाश भेकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. घाणेखुंट खोंडेवाडीतील ते ग्रामस्थ आहेत. या वाडीला प्रथमच तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. यावेळी ग्रामसेवक दरडी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धापसे, मधुकर धापसे, उपसरपंच रवींद्र खांबल, राजू ठसाळे, सुरेश कांबळे, मधुकर गवळी, खांबल मामा, सुरेश मोगरे, अरुण ठसाळे, मसूद सुर्वे, शांताराम बैकर, प्रकाश खताते उपस्थित होते.