शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ८९२ ग्राहकांनी वेळेवर वीजबिले न भरल्यामुळे ५२ कोटी ९६ लाख २९ हजार रुपयांची थकबाकी आहे. महावितरणकडून वेळोवेळी वीजबिले भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद लाभत असल्याने अखेर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

गतवर्षी मार्चपासून काही ग्राहकांनी वीजबिले न भरल्यामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७० ग्राहकांकडे २३ कोटी ३८ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या १४,६४५ ग्राहकांकडे ८ कोटी ४९ लाख १७ हजार, औद्योगिकच्या १,८०५ ग्राहकांकडे ३ कोटी ९८ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४,१६० ग्राहकांकडे ७२ लाख ८९ हजार, पथदीपांचे १,५४३ ग्राहकांकडे ९ कोटी ७६ लाख ७३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १,३६५ ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख ६९ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

चिपळूण विभागातील ४३,९६५ ग्राहकांकडे १५ कोटी ७१ हजार ८ रुपये थकीत आहेत. त्यापैकी ३६,५९५ ग्राहकांकडे ७ कोटी ७३ लाख १२ हजार, वाणिज्यिकच्या ४,३६३ ग्राहकांकडे ३ कोटी १५ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ४६२ ग्राहकांकडे १ कोटी ३२ लाख ९७ हजार, कृषीच्या १,२७१ ग्राहकांकडे २१ लाख २० हजार, पथदीपच्या २२९ ग्राहकांकडे १ कोटी ८१ लाख ६१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३०५ ग्राहकांकडे १ कोटी २५ लाख रुपये थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील ४२,८८५ ग्राहकांकडे १३ कोटी २० लाख ४४ हजार रुपये थकबाकी आहे. पैकी ३५,९८७ घरगुती ग्राहकांकडे ५ कोटी ५२ लाख २ हजार, ३,४९९ ग्राहकांकडे १ कोटी ८० लाख ३८ हजार, औद्योगिकच्या ३९६ ग्राहकांकडे ९३ लाख ५० हजार, कृषीच्या १,३१० ग्राहकांकडे २२ लाख ८ हजार, पथदीपच्या ४६५ ग्राहकांकडे ३ कोटी १४ लाख ७९, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ३९० ग्राहकांकडे एक कोटी ११ लाख ३४ हजार रुपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागातील ७४,०४२ ग्राहकांकडे २४ कोटी ४ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. पैकी ५९,४८८ ग्राहकांकडे १० कोटी १३ लाख ६४ हजार, वाणिज्यिकच्या ६,७८३ ग्राहकांकडे ३ कोटी ५२ लाख ९३ हजार, औद्योगिकच्या ९४७ ग्राहकांकडे १ कोटी ७१ लाख ७६ हजार, कृषीच्या १,५७९ ग्राहकांकडे २९ लाख ६१ हजार, पथदीपच्या ८४९ ग्राहकांकडे ४ कोटी ८० लाख ३३ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६७० ग्राहकांकडे एक कोटी २६ लाख १० हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

----------------------------

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. पुरवठा खंडित केलेल्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा जोडणे, शेजारी वा इतरांकडून वीज घेणे अथवा अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- विजय भटकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ