शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले

By admin | Updated: April 25, 2015 01:08 IST

मळेवाड येथील घटना : पाच हजाराला गोव्यात विक्री; पोलिसांकडून चौकशी, तक्रार नाही

सुभाष परूळेकर / मळेवाड पदरी अठराविश्व दारिद्र्य, कुणाकडे तरी मोलमजुरी करायची आणि दोन वेळची पोटाची खळगी भरायची; पण आपणालाच मिळत नाही, तेथे मुलाला कोठून घालायचे, अशा विवंचनेत असलेल्या मळेवाड - जांभळीचे भरड येथे भाड्याने राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या चार महिन्यांच्या बालकालाच चक्क गोव्यात विकले. पहिल्यांदा मूल चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या या दाम्पत्याला ग्रामस्थांनी हिसका दाखवताच, होय, मी मुलाला पाच हजार रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. आरोंदा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी झापू पवार यांनी या दाम्पत्याची चौकशी केली. मूळचे बांदा-देऊळवाडी येथील खेमराज व गीता सावंत हे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच मळेवाड सीमेवरील जांभळीचे भरड येथे राहण्यासाठी आले. तेथीलच एका ग्रामस्थाच्या पडवीत त्यांनी संसार थाटला. सकाळी कुणाच्या तरी कामावर जायचे आणि संध्याकाळी यायचे. कोणी पैसे दिले तर जेवण, अन्यथा रात्र तशीच काढायची, असा त्यांचा दिनक्रम होता. या दाम्पत्याने २२ डिसेंबर २०१४ रोजी अपत्याला जन्म दिला होता. चार महिने हे अपत्य त्यांच्यासोबत आहे. (पान ९ वर)